केळघर दि.१२ जावली तालुक्यातील मेढा येथिल आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय येथे आज पैलवान खाशाबा जाधव यांची जयंती साजरी करण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. स्वातंत्र्यपूर्व भारतात १५ जानेवारी १९२६ ला खाशाबा जाधव यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात असणाऱ्या गोळेश्वर या खेड्यात झाला. घरची परिस्थिती बेताची होती. खाशाबांचे आजोबा हे उत्तम पैलवान होते. तसेच त्यांचे वडील दादासाहेब जाधव हे सुद्धा ख्यातनाम पैलवान होते.कुस्ती म्हंटल कि सगळ्यांच्या तोंडातून खाशाबा जाधव हे नाव अपोआप निघतं. खाशाबा जाधव यांची कारकीर्दच अशी आहे, कि ज्यांचे नाव घेताना महाराष्ट्रवासियांची छाती अभिमामाने फुलून येते. प्राचीन काळापासून खेळल्या जाणाऱ्या कुस्ती या खेळामध्ये १९५२ सालच्या खेळल्या गेलेल्या ऑलिंपिक मध्ये खाशाबा जाधव यांनी कास्य पदक मिळविले होते. आणि हे पदक स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक पदक होते.
पैलवान खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे यांनी केले प्रास्ताविक प्रा.प्रमोद चव्हाण यांनी केले त्यांनी ऑलम्पिक कास्यपदक विजेते पैलवान खाशाबा जाधव यांच्या जीवनकार्या विषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे डॉ. उदय पवार, डॉ. ओंकार यादव प्रा. सुनील केमदारणे, सौ. धनश्री देशमुख मॅडम तसेच सर्व शिक्षकेतर वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार डॉ. सुधीर नगरकर यांनी मानले.




