दादारुपी व्यक्तीमत्व असलेले स्व.विजयराव धनावडे आज १७ वा स्मृतीदिना निमित्त विविध उपक्रम

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – युवराज धुमाळ
केळघर.दि.०८ स्व.विजयराव आबाजी धनावडे यांचे १७व्या स्मृती दिना निमित्त प्राथमिक शाळा आसनी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सागर धनावडे व धनावडे कुटुंबियांकडून प्राथमिक शाळेस शैक्षणिक साहित्य खरेदी साठी ११००० रू ची देणगी देणेत आली.
स्व.विजयराव आबाजी धनावडे हा माणुस खुपच निराळा जसे अननसाचे फळ वरुन जरी काटेरी दिसत असले तरी आतुन माञ गोड व चवदार तसेच विजयराव वरुन करारी दिसत असले तरी मनात माञ मायेचा ओलावा होता. माझ्या भागाचा,माझ्या गावाचा विकास झाला पाहिजे यासाठी विजयराव हे नेहमीच धडपडत असायचे असे संचालक ज्ञानदेव रांजणे हे या कार्यक्रमाच्या वेळी बोलत होते.
यावेळी जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे साहेब, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल माने, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन रामभाऊ शेलार,लक्ष्मण शेलार, भाऊराव शेलार, अरविंद शेलार , एकनाथ शेलार, पांडुरंग धनावडे,संतोष धनावडे, अंकुश धनावडे, प्रफुल्ल शेलार , निलेश कासार, विश्वनाथ धनावडे , संजय धनावडे,प्रवीण धनावडे, सागर धनावडे, विक्रांत धनावडे, तुषार धनावडे,मनीष धनावडे .शाळेचे मुख्याध्यापक संपत शेलार सर, निकम सर, संतोष शेलार सर उपस्थित होते.
केळघर व मेढा विभागात राष्ट्रवादी पक्ष वाढीसाठी स्व.विजयराव यांनी अपार मेहनत घेतली गावासाठी सतत धडपडणाऱ्या विजयराव धनावडे यांचे कार्य पाहुन १८ व्या वयातच गावकऱ्यांनी त्यांना आसणी ओखवडी गावचे सरपंच पद दिले सदर पदी सलग १५ वर्ष बिनविरोध व पक्ष वाढीसाठी केलेल्या कार्यामुळे त जावली दुध संघाचे व्हा चेअरमनही बनले राजकारण समाजकारणा बरोबरच स्व विजयराव धनावडे हे एक उत्तम कलाकारही होते देव्हारा या गाजलेल्या नाटकात त्यांच्या अभिनयाने अनेकांना मंञमुग्धही केले.
अशा या आपल्या कार्यकर्तुत्वाने ते सर्वांचेच दादा बनले सगळे लोक त्यांना दादा या नावानचे संबोधु लागले राजकारणातील परिपक्वता, समाजकारणाची आवड व सहकाराचा अभ्यास असलेले हे व्यक्तिमत्व सर्वांच्या आवडीचे होते.अशा या सामान्यप्रति आस्था व प्रेम असणाऱ्या स्व विजयराव धनावडे ( दादा) यांना ८ एप्रिल २००५ रोजी काळाने हिरावुन नेले व दादा हे जग सोडुन गेले त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवुन त्यांचे सुपुञ श्री सागर विजयराव धनावडे त्यांचा वसा व वारसा चालवत आहेत. त्यांच्या या कायॉमुळे ते आमदार शशिकांतजी शिंदे साहेब यांच्या गळ्यातील ताईत बनले.आजही शशिकांतजी शिंदे जर आसणी या गावी आले तर स्व विजयराव धनावडे यांची आठवन काढतात याच बरोबर स्व आ लालसिंगराव शिंदे,स्व आ जी.जी कदम यांच्या विजयात ही विजयराव यांचा सिंहाचा वाटा होता जावलीचे माजी सभापती बापुराव पार्टे व माजी तालुकाध्यक्ष स्व पांडुरंग पार्टे यांच्या राजकिय कारकिर्दिस विजयराव धनावडे यांची समर्थ साथ होती.



