कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील याने विजय मिळवत ६४ वा महाराष्ट्र केसरी होण्याचा ठरला मानकरी

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सातारा.दि.०९.महाराष्ट्र केसरीच्या गदेसाठी कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विरुध्द विशाल बनकर यांच्यात आज अटीतटीची लढत झाली. यामध्ये गुणाधिक्क्याने पृथ्वीराज पाटील याने विशाल बनकर याचा पराभव करत, २०२२ ची महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली.
पृथ्वीराज पाटील याने विजय मिळवत ६४ वा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला.कुस्ती क्रीडा प्रकारातील मानाची स्पर्धा असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत
कोल्हापूर जिल्ह्याला तब्बल २२ वर्षांनंतर चांदीची गदा मिरवण्याचा कोल्हापूरच्या मल्लाला आज बहूमान मिळाला आहे.अंतिम सामन्यात कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विरूद्ध मुंबई पूर्वचा मल्ल विशाल बनकर यांच्यात लढत झाली. अटीतटीच्या लढतीत पिछाडीवर असताना पृथ्वीराजनं अखेरच्या ४५ सेकंदात सामन्याला कलाटणी दिली. त्याने ५-४ अशा फरकाने सामना जिंकत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला.



