महाराष्ट्रसातारासामाजिक

शिंगणापूरात शिवपार्वती विवाह आणि पागोटे कार्यक्रम उत्साहात संपन्न

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – सचिन पवार

शिखरशिंगणापूर.दि.०९. चैत्री शु अष्टमी म्हणजे शिवपार्वती विवाह सोहळा आज शिखरशिंगणापुर मध्ये भवानीउत्पत्ती योगावर रात्री १२वा. विवाह सोहळा साजरा झाला,तर दु ४वा. शंभू महादेव मुख्य मंदिर ते अमृतेश्वर मंदिर शिखर कळसास पागोटेधज बांधण्यात आली.

यावेळी मराठवाडा, विदर्भ ,खान्देशातील भाविक भक्तांनी गर्दी केली होती विधिवत महापूजेने विवाह सोहळा संपन्न झाला. शंभू महादेव (शिव) व माता पार्वती (शक्ती) यांना फुलांच्या मुंडावळ्या, बाशिंग बांधण्यात आले. विवाह सोहळ्याप्रसंगी रंगीबेरंगी ज्वारी च्या अक्षताचीं उधळण करण्यात आली. पालखी मिरवणुकी नंतर मंदिर पाठीमागे बोहल्यावर गुलाबीरंगांची उधळण करण्यात आली. कोरोना महामारी सारखी संकट नष्ट होऊ देत या प्रार्थने बरोबरच चांगला पाऊस पाणी पडून कष्टकरी शेतकरी जनता सुखी होऊ दे, जगात सर्वत्र शांतता प्रस्तापित होऊ देत अशी प्रार्थना शंभू महादेव चरणी करण्यात आली. या प्रसंगी शिंगणापूर मधील सर्व सेवधारी मानकरी उपस्थित होते.
श्रीमंत छ राजमाता यांचे हस्ते महापूजा हळदीच्या पंचमीने शंभू महादेव यात्रेस प्रारंभ झाला.दरम्यान खा.श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे वतीने महापूजा करण्यात आली तर श्री. छ.राजमाता कल्पनाराजे भोसले यांचे हस्तेशिखा शंभू महादेवाची विधिवत महापूजा करण्यात आली.

शिंगणापूर यात्रेत उर्वरित दिवशी विविध उत्सव साजरे होणार आहेत.रामनवमी उत्सवासह, १२एप्रिल एकादशी मुख्य दिवशी इंदोरराजे काळगावडे दर्शन घेणार आहेत.१३ला द्वादशी बारस असून मुगीं घाटातून मानाच्या कवडी वर येणार आहेत.त्रयोदशी ला चिमणगाव पालखी देवदर्शन आणि १६ एप्रिल ला पाकळणी महापूजेने शिंगणापूर यात्रेची सांगता होणार आहे. दरम्यान शिंगणापूर परिसर खेळणी,दुकाने व व्यसईकांनी बहरून गेला आहे. दोन वर्षानंतर यात्रा होत असल्याने सर्वत्र उत्साह दिसून येत आहे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!