महाराष्ट्रमुंबई व नवी मुंबईसामाजिक

सँडहर्स्ट रोड स्थानकाचे स्टेशन मास्टर विनायक शेवाळे यांचा श्री.जितेंद्र दगडू सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत केला सत्कार

स्टार ११महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

मुंबई.दि.१०.ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेच्या व आखिल भारतीय पत्रकार संसद समिती चे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष मा.डॉ.श्री.अविनाश सकुंडे, सौं चेतना अविनाश सकुंडे यांच्या आदेशाने व ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री.जितेंद्र दगडू सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मध्य व हार्बर दोन्ही मार्गाना जोडणाऱ्या सँडहर्स्ट रोड स्थानकात स्टेशन प्रबंधक म्हणून कार्यरत असणारे स्टेशन मास्तर श्री विनायक शेवाळे यांचा संघटनेच्या वतीने त्यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
आपले कर्तव्य बजावत असताना श्री विनायक शेवाळे यांनी न भूतो न भविष्यती असे जनजागृती व सर्वसामान्य जणांच्या डोळ्यात अंजन घालण्यासारखे समाज कार्य केले आहे,त्यांनी सँडहर्स्ट रोड स्थानकाचा कायापालट केला,वर्दळ व अस्वच्छ असणारे स्थानक आणि आजूबाजूचा अस्वच्छ परिसर आपल्या अंगीकृत असलेल्या कौशल्याने टाकाऊ वस्तूंचा व सांडपाणी उदा.टमरेल, तुटलेले पाईप, एस.आर.पी. जवानांच्या फाटलेल्या टोप्या वस्तूंचा वापर करत कार्यालय व परिसरात फुलझाडे व छोटी रोपटी लावून परिसराला एका आल्हाददायक व प्रदूषण मुक्त वातावरणाचा आस्वाद प्रवाशांना घेता येईल अशी कामगिरी केली.
त्यांची विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ते टेरीटोरियल आर्मीचे सदस्य असून आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून सैन्यदलाला मदत करीत असतात,त्यांच्या या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेऊन ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी व ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशन या संघटनेच्या वतीने त्यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी चे महाराष्ट्र सचिव श्री.अमित देशमुख,मुंबई उपाध्यक्ष श्री.सिद्धेश मोहिरे,IHRAO चे श्री.सुहास परब,शाखा 203 च्या उपशाखा संघटिका सौ.प्रमिला अडसुळ,UHRC चे श्री.प्रकाश आंब्रे, समाजसेवक श्री.दत्तराज आंब्रे, शिव सामर्थ्य सेनेचे श्री.लितेश केरकर, श्री.विरेंद्रसिंह वाघेला, श्री.राजेश्वर धांडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!