महाराष्ट्रसातारासामाजिक

आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले जावली केसरी बैलगाडा शर्यत दि.१३ रोजी कोलेवाडी सोमर्डी ता.जावली येथे आयोजीत

स्टार ११ महाराष्ट्र – युवराज धुमाळ

केळघर. दि.११. सातारा जावळीचे आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे वाढदिवसानिमित्त जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत बाबाराजे जावली केसरी बैलगाडा शर्यत २०२२ दि. १३ एप्रिल रोजी बुधवारी कोलेवाडी सोमर्डी ता.जावली येथे आयोजीत केलेली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर जावली तालुक्यात बैलगाडा शर्यतीचे प्रथमच आयोजन करण्यात आले आहे आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैलगाडा शर्यतीचा प्रारंभ करण्यात येणार असून अनेक वर्षांनी बैलगाडा शर्यती होत असल्याने बैलगाडा मालकांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे.
मा.सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाप्रमाणे रितसर मैदान होईल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडा शर्यत प्रेमी, बैलगाडा मालक, सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी केले.
  सदर स्पर्धेचे प्रथम पारितोषीक रोख रक्कम १२५००० रुपये व ७ फुटी ढाल,व्दितीय पारितोषीक १००००० रोख रक्कम६ फुटी ढाल,तृतीय पारितोषीक ७५०००रोख रक्कम ५ फुटी ढाल,चतुर्थ पारितोषीक ५१००० रुपये रोख रक्कम ४ फुटी ढाल,पंचम पारितोषीक २५००० रुपये रोख रक्कम ३ फुटी ढाल,सहावे पारितोषीक ११०० रुपये रोख रक्कम २ फुटी ढाल, या स्पर्धेत लाखो रुपयांची बक्षिसे दिली जाणारआहेत.
या स्पर्धेच्या दिवशीचे विशेष आकर्षण म्हणजे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मानकरी ठरलेला श्री पृथ्वीराज पाटील यांना सातारा जावळीचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जाहीर केलेली ५ लाख रुपये रोख रक्कम श्री पृथ्वीराज पाटील यांना आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे हस्ते याच ठिकाणी वितरीत केली जाणार असून समस्त जावली करांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!