महाराष्ट्रविवाहबंधसातारा

सातारा येथे पार पडलेल्या बेलदार वधु – वर परिचय मेळाव्यास उत्फुर्त प्रतिसाद .

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
केळघर. दि.११.सातारा येथे झालेल्या बेलदार वधु – वर परिचय मेळाव्यास उत्स्फुर्त प्रतिसाद सनाया फाऊंडेशन व बेलदार समाज वधू – वर सुचक समितीने आयोजीत केलेल्या मेळाव्यास संपूर्ण महाराष्ट्रासह गोवा , गुजरात येथुनही समाजबांधव उपस्थित होते.
यावेळी बेलदार समाजाचे जेष्ठ नेते सर्जेराव बापु मोहिते, निवृत्त मंत्रालय अधिकारी श्री अशोकराव मोहिते, सामाजीक कार्यकर्त्या सौ .रजनीताई पवार , मेळाव्याचे आयोजक डॉ भगवान मोहिते,सुरेश चव्हाण, अंकुश पवार , किसण चव्हाण, किशोर मोहिते , आप्पासाहेब चव्हाण, गणेश साळुंखे, ज्ञानेश्वर चव्हाण, भरत मोहिते, किरण चव्हाण, अशोक पवार, मधुकर मोहिते, बाळकृष्ण पवार पत्रकार नारायण जाधव , श्रीकांत मोहिते, विकास पवार,भगवान मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती .
सातारा येथे संपन्न झालेल्या वधू -वर परिचय मेळाव्यामध्ये एकूण ७२ मुलामुलींचे बायोडाटा नोंद झाली असुन या मेळाव्यास ठाणे , पालघर , वसई, भिवंडी,अलिबाग अलिबाग, पनवेल, माणगांव ,कराड, कोल्हापुर , चिपळुण , सिंधुदुर्ग , पुणे, बारामती यासह संपूर्ण महाराष्ट्र ,गोवा , गुजरात येथील वधु – वर आपल्या पालकांसह उपस्थित होते.
यावेळी उपस्थित वधू – वरांचे बायोडाटा वाचन व सूत्रसंचालन अंकुश पवार यांनी केले तर उपस्थित समाजबांधवांचे स्वागत डॉ भगवानराव मोहिते यांनी केले तर आभार नारायण जाधव यांनी मानले .

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!