
स्टार ११ महाराष्ट्र – अभिजित शिंगटे
मेढा.दि.१३. पिंपरी तर्फ मेढा शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा मोठ्या उत्साहात आणि उत्कृष्ठ नियोजनात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी येथे शालेय मेळावा संपन्न झाला.
पिंपरी गावच्या सरपंच सौ.आशा वांगडे, शालेय समिती अध्यक्षा आश्विनी पवार, ग्रामपंचायत सदस्या सुनिता वांगडे यांचे उपस्थितीत घेण्यात आला. या वेळी उपस्थित पालकांना शालेय जीवनातील महत्व या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी निलम वांगडे. रुपाली वांगडे, श्रेया वांगडे, वंदना वांगडे, प्राजक्ता वांगडे, चंद्रभागा वांगडे, वेणूबाई वांगडे यiची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पिंपरी शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती दिघे यiनी तर आभार आश्विनी लोहार यांनी मानले . कार्यक्रम यशस्वी करणेकामी अंगणवाडी सेविका सीमा वांगडे, मदतनीस वनिता वांगडे यांचे सहकार्य लाभले .



