क्राईम

दहिवडी पोलिस स्टेशनमध्ये दोन मारहाणीचे गुन्हे दाखल तर एकाचा अपघाती मृत्यू…

स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी – चैतन्य नंदकुमार काशिद

दहिवडी.दि.०९.दहिवडी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील शिंदी खूर्द या ठिकाणी कृष्णा संपत जाधव यांच्या फिर्यादीनुसार आरोपी दत्तात्रय पांडूरंग जाधव, प्रदीप प्रकाश जाधव, संदीप प्रकाश जाधव तसेच प्रकाश पांडूरंग जाधव इ.सर्व रा.शिंदी खूर्द यांचेविरुद्ध शिवीगाळ,दमदाटी करून मारहाण केल्याप्रकरणी दि. ८ आॕगस्ट रोजी, आय.पि.सी. कलम ३२३,३२४,३४ अंतर्गत दहिवडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.याबाबतचा अधिक तपास पो.ना.खाडे करत आहेत.

मलवडी येथील तेलदरा येथे भिमराव शिवाजी शेंडे रा.आंधळी ता.माण यांच्या फिर्यादीनुसार आरोपी नेताजी रघुनाथ शिंदे रा. तेलदरा, मलवडी यांचेविरूद्ध गंभीर दुखापत केल्याप्रकरणी आय.पि.सी. कलम ३२६, ३२३ अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यापुढील अधिक तपासस.पो.फौ.हांगे करत आहेत.

बिजवडी येथे दि.२८ जूलै २०२३ रोजी अशोक लेलॕंड पिकअपची धडक बसल्याने झालेल्या अपघातात मयत दुचाकी चालक यश छगन बनसोडे वय १९ वर्षे रा.पाचवड, ता.माण,जि. सातारा यांस प्रथमतः सुविधा हाॕस्पिटल फलटन येथे वैध्यकिय उपचारासाठी नेले तद्नंतर पुढील वैद्यकिय उपचारासाठी ससून रूग्णालय,पुणे येथे हलवण्यात आले.दि.२ आॕगस्ट रोजी पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान यश बनसोडेचा मृत्यू झाला.सीआरपीसी १७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या तिनही गुन्ह्यांचा अधिक तपास सपोनि अक्षय सोनवने यांचे मार्गदर्शनपर सुचनेनुसार चालू आहे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!