शैक्षणिक

प्रांताधिकारी दादासाहेब दराडे यांच्या हस्ते मेढा येथे विद्यार्थ्याना विविध दाखल्यांचे वाटप

 

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज ——  युवराज धुमाळ 

 

मेढा. दि.०६. मेढा तालुका जावली येथील श्री वेण्णा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज येथे जावली तालुका महसूल विभागाच्या वतीने महसुल सप्ताह निमित्त विद्यार्थ्याना प्रांताधिकारी दादासाहेब दराडे व तहसीलदार हणमंत कोळेकर यांच्या हस्ते विविध दाखल्यांचे आज वाटप करण्यात आले.

पांताधिकारी दादासाहेब दराडे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व समजावून स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्याना खुप अभ्यास करून आपापल्या आई वडिलाबरोबर शाळेचे व आपल्या गावाचे नाव मोठे करा, समाजात आपले चांगले स्थान निर्माण करा.व्यसनापासून दुर रहा,असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना तहसीलदार हणमंत कोळेकर यांनी या कार्यक्रमाच्या वेळी केले.

विद्यार्थ्याना पुढील शिक्षणसाठी लागणारे उत्पन्नाचे दाखले, रहिवाशी दाखले,आधार अपडेट विद्यार्थ्यांना पांताधिकारी दादासाहेब दराडे यांच्या हस्ते देण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य श्री. बी.बी.पाटील सर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.ईतर मान्यवरांच्या हस्ते विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य श्री.पाटील बी.बी. यांनी केले. त्यांनी संस्थे विषयी आणि शाळेतील विविध उपक्रमा विषयी माहिती सांगितली. ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख कदम सर यांनी आभार प्रदर्शन केले आहे व सूत्रसंचालन शिंदे सर यांनी केले.

या कार्यक्रमास मंडळ अधिकारी संतोष मुळीक, तलाठी सावंत तहसील कार्यालयातील सुनील पंडित, सौ. विमल सपकाळ, सौ. ऋतुजा मोरे आणि इतर सहकारी उपस्थितीत राहून शाळेतच दाखले तयार करून देण्यात आले. या कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!