
स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी
कुसुंबी.दि.०७.जि. प. प्राथमिक शाळा मामुर्डी याठिकाणी आज झालेल्या जावळी तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत पंचक्रोशी विद्यालय मालचौंडी 17 वर्षाखालील मुलींच्या संघाने सावली, कापसेवाडी, केळघर हायस्कूल या संघाना मात देत विजेतेपद मिळविले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले.
श्रावणी कदम, अपर्णा कदम, अदिती कदम, पायल सपकाळ, रुपाली गोरे,महेश्वरी शेलार, अदिती शिंगटे, सानिका कदम, अंकिता गोरे,सानिका धनावडे, सोनाली भोसले,समीक्षा गोरे,दीक्षा दुंदले, श्रावणी दुंदले, साक्षी शेलार,समीक्षा रवले
सर्व सहभागी खेळाडूंनी अप्रतिम कामिगिरी करत विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यांना विद्यालाचे मुख्याध्यापक श्री मगरे एस. डी. व विद्यालातील शिक्षक श्रीम बर्गे एस. एच. श्री कांबळे डी.एम. श्री चव्हाण यू.जे. श्री पाटसुते वि. ए. यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी संघाचे अभिनंदन केले व जिल्हास्तरावर खेळण्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.