शैक्षणिकसातारा

मी कायम शिक्षकांना प्रोत्साहन देण्याचे काम केलं :- संपतराव धनावडे

स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी — सुनिल धनावडे

मेढा.दि.०७ ऐतिहासिक जावली तालुक्यातील मामुर्डी या गावी जन्मलेल्या आणि पदोन्नतीने अधिकारी होऊनही स्वतःमधील शिक्षक जिवंत ठेवणारे एक असामान्य व्यक्तिमत्व असलेले भणंग केंद्राचे केंद्रप्रमुख श्री संपत लक्ष्मण धनावडे केंद्रप्रमुख पदावरून सेवानिवृत्त होत आहेत आपल्या नियोजनबद्ध मार्गदर्शनामुळेच भणंग केंद्राच्या यशाचा चढता आलेख कायमच राहिला .अधिकारी म्हणून निर्जीव कागदापेक्षा हातात खडू घेऊन मुलांना शिकवण्याकडे असणारा आपला कल हीच आपल्या व्यक्तिमत्त्वाची सर्वोत्तम बाब आमच्यासमोर आदर्शवत आहे असे  भणंग केंद्राचे शिक्षकांनी सेवा गौरव समारंभात गौरव उदगार काढले .


                छत्रपती शिवाजी महाराज यांचे पदस्पर्शाने पावन झालेल्या मामुर्डी चे सुपुत्र केंद्रप्रमुख संपतराव धनावडे यांचा सेवागौरव सोहळा मेढा येथे कलश मंगल कार्यालयात संपन्न झाला त्यावेळी माजी आमदार सदाशिव भाऊ सपकाळ म्हणाले आपलेवर दिलेली जबाबदारी कशी पार पाडायची हे संपत धनावडे गुरुजींकडे पाहुन समजते , त्यांनी आपल्या अनुभवाचा लाभ सर्वांना द्यावा . जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे म्हणाले जावली तालुका प्रगतीपथावर आहे त्यामध्ये शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे तसेच संपत सर यांनी आपले शिक्षण क्षेत्रातील अनुभव पुस्तक रुपाने शिक्षकांना सादर करावे असे आवाहन गटशिक्षणाधिकारी धुमाळ यांनी केले .माझ्या यशाचं श्रेय माझे वडील बंधु गणपत बुवा धनावडे व श्रीपती धनावडे याचं आहे मला कायम माझी पत्नी , व माझ्या परिवाराची साथ मिळाली  मी माझे कार्यकालात सर्व शिक्षकांना कायम प्रोत्साहन देण्याचं आणि विद्यार्थांना आनंद देण्याच काम केलं कामटे मॅडम म्हणाल्या केंद्रप्रमुख म्हणून ज्यावेळी ते शाळेत यायचे तेव्हा मुलांसोबत चर्चा करायचे मुलांच्यात ते कायम रमायचे .कार्यक्रमाला रंगत मिळाली ती अंकुश सपकाळ गुरुजी आणि त्यांचे सहकाऱ्यांचे सदाबहार गीतांच्या कार्यक्रमाने त्याबद्दल सर्वत्र चांगली चर्चा रंगली होती


                सदर कार्यक्रमास माजी आमदार सदाशिव सपकाळ,वसंतराव मानकुमरे,गटशिक्षणाधिकारी.संजय धुमाळ,चंद्रकांत कर्णे,उदयोजक हणमंत पवार, प्रतापगड साखर कारखान्याचे संचालक आनंदराव जुनघरे,दिलिप वांगडे,राजेंद्र जाधव ,विश्वनाथ धनावडे,सुरेश जेधे सुरेश पार्टे अरविंद दळवी, सुरेश शेलार ,रघुनाथ दळवी ,अंकुश सपकाळ गुरुजी,अलका सपकाळ  मॅडम , सरपंच जगन्नाथ धनावडे,पांडुरंग धनावडे बापूसाहेब धनावडे ,शिवछत्रपती कृषी सेवा केंद्राचे प्रकाश धनावडे , बाजीराव धनावडे ,सुरेश धनावडे ,किसन बिरामणे संपत रवले ,तुकाराम जुनघरे,मर्ढेकर साहेब,केंद्र भणंग,हातगेघर ,खर्शी बारामुरे , बेलोशी चे सर्व शिक्षक स्टाफ ,जावली तालुका शिक्षक संघ व जावली तालुका शिक्षक समिती चे सर्व शिक्षक ,पंचक्रोशी मामुर्डी तील ग्रामस्थ उपस्थीत होते.

मानपत्राचं वाचन भोगावली शाळेच्या शिक्षिका सौ सुनिता रितेश गंगावणे यांनी केले प्रस्ताविक लहुराज जाधव सर यांनी केले सूत्रसंचालन शंकर ओंबळे गुरुजी यांनी केले  तसेच महेश धनावडे यांनी आभार मानले

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!