कुसुंबी प्रतिनिधी:संजय वांगडे. दि.०८ प्राथमिक आरोग्य केंद्र कुसुंबी तसेच उपकेंद्र गांजे येथे जन औषधी दिन निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले यावेळी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ .आनंदराव पाटील तसेच डॉ. ऐश्वर्या निकम यांनी आलेल्या आलेल्या रुग्णांची तपासणी करून हायपर टेन्शन व डायबेटीस या आजाराचे उपचार व त्याच्या नियमित सेवनाने होणारे फायदे याबाबत सखोल माहिती रुग्णांना दिली या कार्यक्रमांतर्गत आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, सेविका यांचे मार्फत जनमानसात प्रसिद्धी करून जास्तीत जास्त रुग्णांनी या जन औषधी कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
यावेळी रुग्णांची तपासणी करून बीपी, शुगर असणाऱ्या रुग्णांना योग्य ती औषधे डॉ. आनंदराव पाटील, डॉ. ऐश्वर्या निकम यांच्या उपस्थितीत वितरित करण्यात आली.औषधी बाजारपेठेतील मोठा हिस्सा असल्याने जेनेरिक औषधांचा वापर लोकप्रिय करण्यासाठी आरोग्य विभाग राज्य धोरण म्हणून जनरिकचा प्रचार करतात राज्य सरकार आणि आरोग्यसेवा व्यवसायिकांसह सर्व भागधारकांना एकत्र आणणे आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांना लाभ पोहोचवणे तसेच योजनेसाठी काम करणारे उद्योजक महिला उद्योजक आणि इतरांच्या चांगल्या कामगिरीबद्दल पुरस्कार देऊन गौरव करणे अशी विविध उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम राबविण्यात आला.
गांजे उपकेंद्रांतर्गत सर्व गावातील रुग्णांना एकत्रित करून सर्व रुग्णांच्या तपासण्या करून हायपर टेन्शन, डायबेटीस पेशंट ची औषधे वितरित करून त्यांना औषधे घेण्याच्या पद्धती योग्यरीत्या समजावून सांगण्यात आल्या.यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.आनंदराव पाटील,डॉ. सौ.ऐश्वर्या निकम,तसेच श्री.सतीश मर्ढेकर, श्री.मुरली पवार, सुधाकर बोधे, एम. बी. चौरे, सौ सुवर्णा जाधव. सौ.रूपाली शेलार,सुरेखा गायकवाड,सौ.सोनाली सपकाळ,श्री.प्रदीप पार्टे,अर्चना चिकने, एस.आर.मोरे ,वृषाली चव्हाण,श्रीमती शेडगे,पूजा चिकने सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.



