महाराष्ट्रसातारासामाजिक

प्रेमराज चषक प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरला राजुरी क्रिकेट संघ.

आंधळी.दि.०३ (अतुल खरात). प्रेम फाउंडेशन संचलित प्रेमराज इलेव्हन क्रिकेट क्लब आंधळी आयोजित प्रेमराज् चषक 2023 च्या भव्य टेनिस बॉल फुल पीच क्रिकेट स्पर्धा दि. 25 फेब्रुवारी पासून युट्युब लाईव्ह स्पर्धा खंडोबा क्रीडा संकुल या ठिकाणी सुरू होत्या.

प्रेमराज क्रिकेट आंधळी या संघाने घेतलेले ह्या भव्य अशा प्रेमराज चषक 2023 च्या प्रथम क्रमांकाचे बक्षीस 41 हजार रु. युवा उद्योजक सागर घोरपडे यांनी दिले. तर द्वितीय क्र. बक्षीस 31 हजार रु. युवा नेते पांडुरंग सस्ते, तृतीय क्र. बक्षीस 21 हजार रु. दादा सस्ते, चतुर्थ क्र बक्षीस 11हजार रु.रामचंद्र काळे व तुषार काळे यांनी दिले होते. सर्व बक्षीसास आकर्षक चषक अनिल काळे सर यांनी दिले तर उत्कृष्ट गोलंदाज शूज भेट गणेश गोरे, मॅन ऑफ द मॅच सिरीज सायकल भेट प्रथमेश जमादार, मॅन ऑफ द मॅच व मेडल भेट सरपंच शशिकांत जाधव उत्कृष्ट फलंदाज कृष्णा स्पोर्ट, बॉल बॉक्स उपसरपंच अभिजीत भोसले यांनी दिले होते.

या भव्य अशा प्रेमराज चषक बक्षीस वितरण समारंभ काल फायनल सामन्याच्या दिवशी घेण्यात आला. त्यावेळेस झालेल्या फायनलच्या रोमहर्षक लढतीमध्ये भैरवनाथ क्रिकेट क्लब राजुरी संघाने आयकॉन खेळाडू अभिजीत डांगे यांच्या जोरावर ९१ धावांचा डोंगर उभा केला.आयकॉन प्लेयर अभिजीत डांगे यांनी 24 चेंडूत ७२ धावा पटकावल्या. तर या धावांचा पाठलाग करत असताना वडूज संघाने ३ बाद ४८ धावा पर्यंत मजल मारली. फायनल सामन्यांमध्ये राजुरी संघाने एकतर्फी विजय मिळवत फायनल सामना जिंकला.

या सामन्यांमध्ये प्रथम क्रमांक काळभैरवनाथ क्रिकेट क्लब राजुरी, द्वितीय क्रमांक वडूज संघाने,तृतीय बक्षीस वरद विघ्नेश क्रिकेट राजाळे संघाने, चतुर्थ बक्षीस आजाद क्रिकेट क्लब राणंद या संघाने घेतले. तर उत्कृष्ट फलंदाज – बॅट अमित शिंदे उत्कृष्ट गोलंदाज- बूट आशिष जोशी अष्टपैलू खेळाडू -सायकल अक्षय गायकवाड यांना देण्यात आले.
या सामन्याचे बक्षीस वितरण प्रेम फाउंडेशनचे अध्यक्ष सरपंच दादासाहेब काळे, अर्जुन काळे, वीरधवल खाडे, शिवाजी काळे,सौरभ रुपनवर ,अभिजीत भोसले,बापुराव काळे ,संजय काळे, पत्रकार अतुल खरात, पत्रकार रुपेश कदम ,कुमोद खरात,नितीन सूर्यवंशी, सुरेश पवार, दादा दडस, अतुल शेडगे, आप्पासो बुधावळी, विकास कदम इत्यादी मान्यवरांचे उपस्थितीत पार पडले.

या प्रेमराज चषक भव्य क्रिकेट सामन्यांमध्ये एकूण 36 संघाने सहभाग नोंदवला असून अनेक संघाने उत्कृष्ट खेळ केला. तर प्रेमराज इलेव्हन क्रिकेट क्लब आंधळी या संघाने ह्या उत्कृष्ट असे आयोजन केले होते.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!