स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – युवराज धुमाळ सातारा.दि.२५. सातारा येथील पोदार शाळेचा विद्यार्थी व दृष्टी आर्चरी ॲकॅडमी सातारा चा खेळाडू अपूर्व किरण गोडसे याची राजमुन्द्री,आंध्रप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
हिंगोली येथे दि.१६ ते १८ मे रोजी झालेल्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये अपूर्व गोडसे याने प्रथम क्रमांक मिळवला होता त्यावेळेस त्याला वैयक्तिक एक सुवर्णपदक व एक रोप्यपदक, सांघिक रोप्यपदक प्राप्त झाले होते या यशामुळे त्याची राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झालेली आहे .
अपूर्व यास अकॅडमीचे मानद प्रशिक्षक प्रवीण सावंत व सहाय्यक प्रशिक्षक शिरीष ननावरे सर यांनी मार्गदर्शन केले आहे त्याच सोबत या यशाबद्दल दृष्टी आर्चरी ॲकॅडमी चे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य त्याच सोबत दृष्टी पालक वर्ग यांनी अपूर्व यास पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
स्पर्धात्मक तिरंदाजीत विशिष्ट अंतरावरील निषाणाला अचूक भेदायचे असते. जगभर लोकप्रिय झालेली ही स्पर्धात्मक तिरंदाजी निषाणी तिरंदाजी म्हणून ओळखली जाते.जगातील बहुतेक देशांतही एक स्पर्धात्मक क्रीडाप्रकार म्हणून त्यास मान्यता लाभलेली आहे.
भारतीय तिरंदाजी संघटनेचे सचिव मा. प्रमोद चांदूरकर अपूर्व ला शुभेच्छा देताना