धार्मिकमहाराष्ट्रसातारा

महाराष्ट्र शासनाचा महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान धारेश्वर यांना जाहीर

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – युवराज धुमाळ

मुंबई.दि.१२ तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान धारेश्वर (धारेश्वरमठ ए-१६३० दिनांक.६/२/१९६४) मठाला महाराष्ट्र शासनाकडून महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवापुरस्कार मिळालेला आहे.
महाराष्ट्र शासनाचा महात्मा बसवेश्वर सामाजिक
समता शिवा पुरस्कार २०२०/२१ तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान धारेश्वर यांना जाहीर झाला असून, सदर पुरस्कार शुक्रवार दि. १७ जून रोजी सकाळी १०- ३०वा. मुख्यमंत्री मा.श्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. ( स्वरूप -५१०००रू व सन्मानपत्र )हा पुरस्कार अर्थात सद्गुरू डॉ.नीलकंठ शिवाचार्य महाराज यांच्या अनेक वर्षांच्या तपश्चर्येयं फळ आहे.
यशवंतराव चव्हाण सभागृह,नरीमन पॉइंट मुंबई येथे सर्व भक्त भाविक मानकरी व शिष्य गणांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे प्रतिपादन सद्गुरू डॉ. नीलकंठ शिवाचार्य महाराज यांनी केले आहे.

 

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!