महाराष्ट्रमुंबई व नवी मुंबईसामाजिक

दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक अखेर आज बिनविरोध

स्टार११ महाराष्ट्र न्युज नेटवर्क युवराज धुमाळ

मुंबई दि.१२.जावली तालुक्याची अस्मिता असलेली दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक अखेर सर्वांच्या सहकार्याने आज बिनविरोध पार पडली.
जावली बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल माघार घ्यायचा आजचा शेवटचा दिवस होता अर्ज दाखल केलेल्या सर्व इच्छुकांनी आज मंगळवारी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे या बँकेची निवडणूक बिनविरोध झाली.
डीएमके जावली सहकारी बँकेची निवडणूक २०२२ बिनविरोध संचालकांची अंतिम यादी पुढील प्रमाणे
सर्वसाधारण संचालक विक्रम विजयकुमार भिलारे,अजित कळंबे,चंद्रकांत गावडे,बाळासाहेब भालेघरे,योगेश गोळे प्रकाश मस्कर,संतोष कळंबे,विश्वनाथ धनावडे,अरुण सुर्वे
चंद्रकांत दळवी,रामचंद्र चिकने,गणेश भोसले,महिला राखीव जयश्री मानकुंमरे,उर्मिला रांजणे,इतर मागास प्रवर्ग
चंद्रकांत गवळी,अनुसूचित जाती जमाती विजय कदम, विमुक्त जाती-भटक्या जमाती प्रकाश उर्फ चंद्रकांत कोकरे.
या बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी आमदार शशिकांत शिंदे,आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले,माजी आमदार दगडू दादा सकपाळ आमदार मकरंद पाटील, माजी आमदार सदाभाऊ सपकाळ, वसंतराव मानकुमरे,राजेंद्रशेठ राजपुरे एस एस पार्टे,एकनाथ ओंबळे, यांच्यासह जावली आणि महाबळेश्वर, वाई तालुक्यातील सर्वच पक्षातील राजकीय नेत्यांनी प्रयत्न केले. सर्व माजी संचालक व सगळे इच्छुक उमेदवार या सर्वांनी मोठे मन करून उमेदवारी अर्ज मागे घेतले व खऱ्या अर्थाने जावलीच्या अर्थवाहीनी साठी सर्वांनी एक चांगला आदर्श निर्माण केला.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!