
स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – युवराज धुमाळ
मेढा.दि.०१.जावली तालुक्यामध्येच नव्हे तर जिल्ह्यात देखील नेहमीच वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये(शिष्यवृत्ती,मंथन नवोदय,वक्तृत्व, निबंध, क्रीडा,गीतमंच, बालनाट्य, चित्रकला)अग्रेसर असणारी जिल्हा परिषद ओझरे शाळा.ग्रामस्थांच्या योगदानामुळे,शिक्षक व विद्यार्थी यांच्या कष्टामुळे तसेच प्रशासनाच्या अनमोल अशा मार्गदर्शनामुळे शाळेचा यशाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे.आजपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून ओझरे ग्रामस्थांनी शाळेला मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे.
स्वच्छ विद्यालय पुरस्कार स्पर्धेत सातारा जिल्ह्यातून जिल्हा परिषद ,वेगवेळ्या संस्थेच्या, खासजी प्राथमिक व माध्यमिक अशा जवळ जवळ ४००० पेक्षा जास्त शाळांनी सदर स्पर्धेसाठी रजिस्ट्रेशन केले होते.यामध्ये बऱ्याच शाळांची उत्कृष्ट तयारी होती.निकषानुसार Overall Category मध्ये संपूर्ण जिल्ह्यातून ग्रामीण -6 (elementary-3, Secondary-3) व शहरी -2 (elementary-1, Secondary-1) अशा एकूण 8 शाळांची निवड करण्यात येणार होती.शाळा व्यवस्थापन समिती ओझरे तसेच गावातील देणगीदात्यांनी केलेल्या मदतीमुळे, आदरणीय गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत कर्णे, मा. विस्तार अधिकारी कल्पना तोडरमल मॅडम,केंद्रप्रमुख संपत धनावडे, माजी केंद्रप्रमुख विजय सपकाळ,दत्तात्रय ज्ञानदेव लकडे -शाळा व्यस्थापन समिती अध्यक्ष, दर्शना सचिन कदम-उपाध्यक्ष, मुख्याध्यापक विजय धनावडे, माजी मुख्याध्यापक पांडुरंग सपकाळ यांचे अनमोल मार्गदर्शन, शिक्षकांनी तसेच विद्यार्थ्यांनी सुट्टीत शाळेत थांबून केलेले कष्ट, मुलांमध्ये स्वच्छतेसंदर्भात घडून आलेल्या वर्तनबदलांमुळे सदर स्पर्धेत ग्रामीण भागातील Overall Category मधील ज्या 3 जिल्हा परिषद शाळा निवडण्यात आल्या त्यामध्ये जिल्ह्यात 110 पैकी 110 गुण मिळवून ओझरे शाळा जिल्हा पुरस्काराची मानकरी ठरली.
राज्यस्तरावर देखील शाळेची मांडणी छान झाली आहे परंतु राज्याची स्पर्धा खूप मोठी आहे.राज्यस्तरावर एकूण २८८ शाळांमधून फक्त २० पुरस्कार (ग्रामीण १२ व शहरी-८) दिले जाणार आहेत.त्यामध्ये जिल्हा परिषद शाळांसाठी केवळ ६ पुरस्कार असणार आहेत.
राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी देखील सर्वांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत.शाळेने आजवर जे यश मिळविले आहे यासाठी शाळा व्यवस्थापन समिती ओझरे, ग्रामस्थ मंडळ ओझरे, ग्रामपंचायत ओझरे, जय हनुमान झंज पथक ओझरे, नेहरू युवा मंडळ ओझरे, विकास तरुण मित्र मंडळ ओझरे, वेण्णा फौंडेशन ओझरे,दुर्गा देवी मित्र मंडळ ओझरे, धम्मज्योत तरुण मंडळ ओझरे,सर्व पालक व गावातील सर्वच महिला भगिनी यांचे मोलाचे योगदान आहे.
ओझरे शाळेच्या विकासातून गावाचे शाळेविषयी असणारे प्रेम दिसून येते. गावातील राजकारण बाजूला ठेऊन विद्यार्थ्यांना ज्ञान देणाऱ्या या ज्ञानमंदिरासाठी संपूर्ण गाव आज शाळेच्या सोबत ऊभा आहे. माझी संपूर्ण कमिटी व गुरुजनांनी प्रामाणिक पने केलेल्या कष्टाला फळ मिळाले.पुढील काळात देखील शाळेला संपूर्ण सहकार्य करून शाळेचा गौरव वाढविण्याचा मानस आहे.
दत्तात्रय ज्ञानदेव लकडे
( अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती ओझरे)



