आ.शशिकांत शिंदे महाविद्यालयाच्या वतीने शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मृती दिनानिमित्त सायकल रॅली चे आयोजन

मेढा.दि.२८.26 /11 ला झालेल्या दहशतवादी हल्यामध्ये शहीद झालेल्या जावळीचे सुपुत्र कै.तुकाराम ओंबळे यांच्या स्मृती दिनानिमित्त आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयातील जिमखाना विभागामार्फत सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी शहीद तुकाराम ओंबळे यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांनी करुन शहीद तुकाराम ओबळें यांच्या शौर्याची महती विशद केली. जिमखाना विभागप्रमुख प्रा. प्रमोद चव्हाण यांनी शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅली बद्दलची भूमिका विशद केली. यानंतर महाविद्यालयाच्या प्रांगणातून सायकल रॅलीला प्राचार्य मेजर डॉ.गिरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फ्लॅग ऑफने सुरुवात झाली व शहीद तुकाराम ओंबळे यांच्या केडंबे या जन्मगावी सर्व विद्यार्थी सायकल रॅलीद्वारे दाखल झाले.याप्रसंगी केडांबे येथे जाऊन विद्यार्थी व त्यांच्या सोबत महाविद्यालयाचे प्राचार्य ,सर्व प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी शहीद तुकाराम ओंबळेच्या स्मृतीस अभिवादन केले.

या सायकल रॅलीचे नियोजन महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाचे प्रमुख प्रा. प्रमोद चव्हाण यांच्या मार्गदशनखाली झाले.सायकल रँलीस 30 सायकल स्वार सहभागी झाले होते. सहभागी विद्यार्थ्यांचे प्राचार्यांनी कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.



