
सातारा दि.०४ अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जावली तालुकाध्यक्षपदी संदीप माने यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षापासून काँग्रेसमध्ये सक्रिय असणारे संदिप माने यांना नुकतेच जावली तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

आजवर जावली तालुक्यात केलेल्या कामाची अध्यक्षपदाच्या रूपाने मिळालेली पोहोचपावती असून पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत अधिक जोमाने काम करणार असल्याची प्रतिक्रिया नूतन जावली तालुकाध्यक्ष संदीप माने यांनी दिली.

त्यांच्या या निवडीबद्दल राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, प्रदेश प्रतिनिधी बाबुराव शिंदे, रोहिणीताई निंबाळकर, जिल्हा सरचिटणीस अॅड.दत्तात्रय धनावडे, शिवाजीराव गायकवाड, सेवादल तालुकाध्यक्ष प्रकाश परामणे, विक्रम तरडे, तानाजी रांजणे, शरद मोरे, हणमंतराव यादव, तसेच जावली तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



