महाराष्ट्रसातारासामाजिक

गुरूवर्य भाऊसाहेब नाईक पवार अंबवडे फौंडेशनचे वतीने ७५ वर्षीय ज्येष्ठ व्यक्तींचा सन्मान संपन्न


मेढा. दि.१०. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुरूवर्य भाऊसाहेब नाईक पवार फौंडेशन तफेऀ ७५ वय वर्ष असणाऱ्या महिला व पुरुष ज्येष्ठ व्यक्तीचा सन्मान सोहळा संपन्न झाला.
अंबवडे ता.खटाव येथील भूतेश्वर मंदिर येथे हा सन्मान सोहळा संपन्न झाला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री साहेबराव नाईक पवार ,
उपाध्यक्ष श्री प्रकाश शेठ नलवडे, सचिव श्री माणिक पवार, खजिनदार डॉ सचिन पवार , संचालक श्री अरुण काकडे, श्री प्रशांत कुलकर्णी ,श्री विलास नाईक पवार,श्री डॉ.सोपान पवार,श्री राहूल पवार,श्री दत्ता पवार ,श्री नितीन घाडगे.हे सर्व फौंडेशनचे सर्व पदाधिकारी , संचालक ,ग्रामपंचायत सरपंच सौ.सारिका पवार व उपसरपंच श्री सचिन पाटोळे व सदस्य आणि प्रतिष्ठित ग्रामस्थ तसेच भुतेश्र्वरचे मुख्याध्यापक श्री शिंदे सर उपस्थित होते.


कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून तसेच आदरणीय गुरूवर्य कै.भाऊसाहेब नाईक पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून नंतर भुतेश्र्वर विद्यालयाच्या मुलींनी सरस्वती गिताने कार्यक्रमाची केली.या कार्यक्रमासाठी १५०जेष्ठ पुरूष यांना विलास नाईक पवार यांनी फेटा, शाल श्रीफळ आणि पेढे, अल्पोपहार तसेच महिलांना शाल, श्रीफळ, पुजेसाठी ताट, पेढे देण्यात आले. सर्वांचा योग्य तो आदर सत्कार करण्यात आला.यावेळी फौंडेशनचे सचिव श्री माणिक पवार यांनी फौंडेशनचे उद्देश बद्दल सविस्तर माहिती दिली त्यानंतर मुख्याध्यापक श्री शिंदे सर यांनी जेष्ठ नागरिकांनी या वयात कसे जीवन जगावे व आपला वेळ समाजासाठी कसा देता येईल व त्यांच्या ज्ञानाचा उपयोग समाजाला कसा होईल हे स्पष्ट केले.
फौंडेशनचे खजिनदार डॉ. सचिन पवार यांनी जेष्ठ व्यक्ती समाजामध्ये संस्कृतीचा वसा व वारसा जपणारी , घराला , गावाला गावपण देणारी माणसे असा उल्लेख करुन आपले मनोगत व्यक्त केले.


संचालक श्री अरुण काकडे (तात्या) यांनी उपस्थित असलेल्या जेष्ठांचे त्यावेळीचे लहानपणापासून आनंदाचे जीवन व तरूण पणातील कष्टाचे जीवनाबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. श्रीमती भागीरथी तुकाराम निकाळजे या अंबवडे गावच्या माहेरवाशीण यांनी योगासने फायदे समजावून सांगितले यावेळी श्री संपतराव आण्णा पवार यांनीही योगासनांचे महत्व आणि त्यामुळे आजारपण दूर कसे राहाणार त्यावर माहिती दिली.
फौंडेशनचे संचालक श्री प्रशांत कुलकर्णी यांनी ज्येष्ठांचा अमृत महोत्सव साजरा होत असताना आम्हास तुम्हा सर्वांचा सुर्वण मोहोत्सव साजरा करता यावा असे सांगितले.या कार्यक्रमाचे योग्य व नियोजनपूर्वक सुत्रसंचालन प्रशांत कुलकणी यांनी केले तर आभार विलास नाईक पवार यांनी मानले.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!