मेढा प्राथामिक शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदीपक यश..!एकूण१० विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक गुणवत्ता यादीत…..


मेढा. दि.०९. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मेढा ता. जावली येथिल प्राथमिक शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे.यामध्ये कु.स्वरा संजय वांगडे २६६ गुण प्राप्त करीत तालुक्यात प्रथम तर जिल्ह्यात द्वितीय आली आहे. या सर्व विद्यार्थी आणि मेढा केंद्र शाळेचे या यशबद्दल तालुक्यातून कौतुक होत आहे.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता ५ वी चे जिल्हा गुणवत्ता यादीत ६ विद्यार्थी चमकले आहेत. त्यामध्ये स्वरा संजय वांगडे – २६६ गुण मिळवून प्रथम आली. अथर्व किरण ढेबे – २६४ गुण, शंभूराज विलास मासाळ – २६२गुण, आर्यन राजू मेश्राम – २५४ गुण, शिवराज विजय कदम २५० गुण,वेदांत विनायक जवळ – २४८ गुण, एकूण ६ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत.पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ईयत्ता ८ वी मध्ये ४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. यामध्ये क्षितिजा अंकुश गोळे – २५२ गुण, मनिषाकुमारी अशोक साह – २५० गुण ,अथर्व शिवाजी क्षिरसागर- २४२गुण , प्राची दत्तात्रय सरगर – २३४ गुण, मिळवून शाळेचे एकूण दहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत.

या सर्व विद्यार्थ्यांना.योगीता मापारी, सीमा शिंदे, निवृत्ती धनावडे या सर्व शिक्षक याच बरोबर हणमंत धनावडे, स्नेहल कारंजकर, अनुपमा दाभाडे,मुख्याध्यापक, सुरेश शेलार , नंदकुमार शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
गटशिक्षणाधिकारी कल्पना तोडरमल मॅडम शिक्षण विस्तारअधिकारी चंद्रकांत कर्णे,केंद्रप्रमुख अलका संकपाळ रमेश चव्हाण,शिक्षकवृंद मेढा,अध्यक्ष व शाळा व्यवस्थापन समिती मेढा, ग्रामस्थ मंडळ मेढा.यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे मनपूर्वक अभिनंदन केले.



