धार्मिकमहाराष्ट्रसातारा

कुसुंबीची काळुबाई दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न


कुसुंबी.दि.११.कुसुंबीची काळुबाई दिनदर्शिका प्रकाशन सोहळा आज कुसुंबी गावचे नवनिर्वाचित सरपंच श्री मारुती चिकणे बापू, ग्रामपंचायत सदस्य, काळेश्वरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. रामदास वेंदे उपाध्यक्ष विजय वेंदे सचिव किसन दादा चिकणे, श्री.श्रीकांत चिकणे तसेच कुसुंबीतील ग्रामस्थ, विश्वस्त महिलावर्ग यांच्या उपस्थितीत पार पडला.

महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो भाविक भक्तांची श्रद्धास्थान असलेली कुसुंबीची आई काळेश्वरीची वार्षिक यात्रा ८ फेब्रुवारी २०२३ रोजी जागर (छबिना) पालखी सोहळा तर ९ फेब्रुवारी देवीची यात्रा संपन्न होणार आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्रातील अनेक भाविक भक्त उपस्थित राहतात आलेल्या भाविक भक्तांना श्री काळेश्वरी देवी विश्वस्त मंडळ यांचे कडून देवीच्या नावाची दिनदर्शिका भेट दिली जाते,त्यामुळे अनेक भाविक भक्तांना या दिनदर्शिका लाभ होतो. या कार्यक्रमासाठी कुसुंबी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!