महाराष्ट्रमुंबई व नवी मुंबईराजकीय

शिव आरोग्य सेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री.जितेंद्र दगडू(दादा) सकपाळ यांनी नायगाव येथील पोलीस रुग्णालयाची दुरावस्थे बद्दल केली चौकशी

मुंबई.दि.१४.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेच्या अध्यक्षा डॉ.शुभाताई राऊळ, कार्याध्यक्ष डॉ.किशोरजी ठाणेकर ह्याचा सुचनेनुसार व शिव आरोग्य सेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री.जितेंद्र दगडू(दादा) सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज दिनांक १४/०१/२०२३ रोजी पोलीस रुग्णालय नागपाडा येथे पोलीस सर्जन डॉ.के.स.पाटील सर (M.B.B.S,MD(fmt) यांची भेट घेतली.

महाराष्ट्र शासन गृह विभाग अंतर्गत येणाऱ्या राजवाडी रुग्णालय शवविच्छेदन इमारतीमध्ये मयत इसमाच्या नातेवाईकांना बसण्याच्या जागेची असलेली दुरावस्था व सदर इमारतीची अवस्था धोकादायक झाली आहे इमारतीमुळे मयत इसमाचे नातेवाईक व रुग्णालयातील कर्मचारी यांचे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो तसेच पूर्वी रुग्णालयातून शवविच्छेदना साठी मयत घेऊन येताना स्टेचरवरून घेऊन जायची व्यवस्था होती परंतु तो मार्ग बंद करून ठेवलेला असल्याकारणाने नातेवाईकांना रुग्णवाहिका भाड्याने करावी लागते व नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो तसेच नायगाव येथील पोलीस रुग्णालयाची अवस्था देखील अतिशय बिकट असून त्यात सुधारणा करण्यात यावी या विषयावर डॉ.पाटील सर यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली व त्यांना संघटने कडून निवेदन देण्यात या सर्व अडचणींवर तत्परतेने पूर्ण लक्ष देऊन समस्या मार्गी लावू असे डॉक्टर साहेबां कडून आश्वासन देण्यात आले.

या प्रसंगी शिव आरोग्य सेनेचे मुंबई जिल्हा संपर्क समन्वयक श्री.अमोल वंजारे,मुंबई जिल्हा समन्वय सचिव सौ.ज्योतीताई भोसले,सौ.सुप्रिया ठोंबरे पाटणे,मुंबई उपनगर(पूर्व) सहसमन्वयक श्री.प्रकाश वाणी,उपनगर (पूर्व) समन्वयक सचिव श्री.शिवाजी झोरे,घाटकोपर (पश्चिम) विधा.समन्वयक श्री.विनायक कानसकर, श्री.रितेश पाचारकर, श्री.लितेश केरकर, श्री.हितेश गायकवाड व इतर शिवसैनिक उपस्थित होते.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!