विश्वंभरबाबा अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेस वाढदिवसानिमित्त पांडुरंगाची मुर्ती भेट


मेढा.दि.०१.विश्वंभरबाबा अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था मेढा गांजे प्रातः स्मरणिय गुरूवर्य वै.ह भ प भिकोबा महाराज देशमुख यांच्या प्रेरणेने व शुभाशिर्वादाने तसेच गुरुवर्य ह भ प अतुलजी महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे मेढा येथे अध्यात्मिक व शालेय शिक्षणाचे धडे देण्याचे थोर कार्य करीत आहे.
१६ जून २०१७ या वर्षांपासून ही संस्था कार्यरत आहे. व्यसनाधिन होऊन वाईट मार्गाला लागलेल्या तरूणाईला सन्मार्गावर आणून त्यांना आध्यात्मिक क्षेत्राची आवड लागावी,भगवान परमात्मा विषयक प्रेम त्यांच्या मनात निर्माण व्हावे व देव, देश, धर्म यांचे भविष्यात पालन व्हावे, हे या संस्थेचा मूळ उद्देश आहे. इयत्ता चौथीपासून बी. एड पर्यंत अध्यात्मिक शिक्षणाबरोबरच शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी आपणास पहावयास मिळतात. त्यांना योग्य मार्गदर्शन करणारा अध्यापक वर्ग संस्थेत उपलब्ध आहे. हे कार्य करीत असताना यथोचित दानधर्म करणाऱ्या हितचिंतक मंडळींची या संस्थेस मदत होते.
आपल्या संस्थेचे हितचिंतक मार्गदर्शक श्री.दिपक भाऊ कदम.महेश गॅस एजन्सी मेढा यांच्याकडून प्रशांतदादा गुरव यांच्या वाढदिवसानिमित्त विश्वंभरबाबा अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेस पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याची मुर्ती भेट देण्यात आली. या आनंददायी प्रसंगी दिपक भाऊ कदम तसेच संतोषजी वारागडे, जब्बारभाई पठाण, सचिन दादा करंजेकर, सुनिल नाना देशमुख, रिकी तिवाटणे, प्रशांत करंजेकर तसेच संस्थेतील विद्यार्थी उपस्थित होते.



