महाराष्ट्रसातारासामाजिक

महसूल विभाग व तालुका प्रशासन यांचे संयुक्त विद्यमाने मेढा येथे महाराजस्व ( शासन आपल्या दारी ) अभियान शिबीर

मेढा.दि.१०.(युवराज धुमाळ) महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविणेत येणारा महाराजस्व ( शासन आपल्या दारी ) अभियान कार्यक्रमांतर्गत शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील जनतेस विहित कालमर्यादेत मिळावा याबाबत शिबीराचे आयोजन करुन विविध योजनांचा लाभ त्यांना पोचविण्याच्या उददेशाने जावली तालुक्यातील मेढा व केळघर मंडलातील लाभार्थी यांचेसाठी महाराष्ट्र शासन महाराजस्व अभियान (शासन आपल्या दारी) हा कार्यक्रम महसूल विभाग व तालुका प्रशासन यांचे संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक.१४ फेब्रुवारी २०२३ रोजी कलश मंगल कार्यालय, मेढा येथे सकाळी १०.००वा. ते सायं.०५.०० वा.या वेळेत आयोजित केला आहे.

सदर कार्यक्रमामध्ये दिवसभरात प्राप्त झालेल्या अर्जावर नियमानुसार कार्यवाही करुन त्याचे निराकरण केले जाणार आहे. तसेच शासनाच्या विविध योजनाची माहिती देणेत येणार आहे.तरी सदर कार्यक्रमास उपस्थित राहणेबाबत मेढा व केळघर मंडलातील सर्व जनतेस तालुका प्रशासन यांचे वतीने तहसिलदार जावली (मेढा) आवाहन करीत आहेत. सदर कार्यक्रमामध्ये विविध विभागामार्फत खालील प्रमाणे लाभ देणेत येणार आहे.

1.तहसिल कार्यालय जावली (मेढा) – शिधापत्रिकेतील नाव कमी करणे, वाढविणे, दुबार / नविन / विभक्त शिधापत्रिका अर्ज स्विकारणे, जातीचे दाखले, नॉन क्रिमीलेअर दाखले, डोंगरी दाखले, डोमासाईल दाखले, संगायो व इंगायो विभागामार्फत देणेत येणाऱ्या सर्व योजनाचे अर्ज स्विकारले जाणार आहेत. 

2.पंचायत समिती जावली (मेढा) – जन्मनोंदणी प्रमाणपत्र, रहिवास दाखला व प्रमाणपत्र, विवाहाचा दाखला, नोकरी व्यवसायासाठी नाहरकत प्रमाणपत्र, मालमत्ता आकारणी प्रमाणपत्र, बेराजगार प्रमाणपत्र व इतर दाखल यांचे वितरण करणेत येणार आहे.

   3.तालुका कृषि विभाग जावली (मेढा) – कृषि यांत्रिकीकरणांतर्गत यंत्रे व अवजारे वाटप, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रीया उदयोग उभारणी मंजुरीचे पत्र देणे, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजने अंतर्गत मंजुर प्रस्तुवांचे पत्र वारसांना देणे, शेततळे काढणे निवड झालेल्या शेतकऱ्यांना पूर्णसंमत्ती पत्र देणे.

      4.मेढा नगरपंचायत विभाग- प्रधानमंत्री आवास योजना व स्वनिधी योजना याबाबत माहिती देणे.

   5.आरोग्य विभाग – आभा कार्ड वाटप, ई- कार्ड वाटप, हृदयरोग, मधूमेह, कॅन्सर, रक्तदाब, रक्त तपासणी.

      6.एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प जावली माझी कन्या भाग्यश्री योजनाअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रा वाटप. 0 ते 6 वर्ष बालकांचे आधारकार्ड काढणे.

       7.वनपरिक्षेत्र विभाग- वनवा प्रतिबंध पथनाटय, वनवा, वन्यजीव प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण कसे करावयाचे याची माहिती देणे.

     8.एस. टी. महामंडळ- जेष्ठ नागरिक स्मार्ट कार्ड वाटप, विदयार्थी पास वाटप 

     9.पशु संवर्धन – जनावरे तपासणी, वंधत्व तपासणी, गोचिड निर्मूलन, लसीकरण (शेळया मेंढया).

    10. विदयुत विभाग – घरगुती मीटर वाटप व अर्ज स्विकारणे

सदर कार्यक्रमामध्ये वरील प्रमाणे विविध विभागामार्फत लाभ देणेत येणार आहेत. तरी मेढा व केळघर मंडळातील सर्व जनतेस आवाहन करणेत येते की, जास्तीत जास्त संख्येने दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी कलश मंगल कार्यालय, मेढा येथे उपस्थित राहावे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!