
मेढा / प्रतिनिधी दि.१३.
सातारा जिल्ह्यातील ब प्रकारातील सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम ,संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन 2022 ते 2028 महाराष्ट्र सहकारी संस्था समिती निवडणूक नियम 2014 चा नियम 19 अन्वयम प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून आणि राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण व जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांनी जाहीर केलेल्या व अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केले ल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकी करता संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केलेले खालील सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूक सण 2022 ते 2028 च्या निवडणुकीतील कार्यक्रमाचे विविध टप्पे खालील प्रमाणे जाहीर करण्यात आले आहेत.
निवडणूक जाहीर झालेल्या संस्थांसाठी नाम दर्शन पत्र विक्री व स्वीकृती 13 /2 / २०२३ पासून ते 17 /2 /2023 अखेर राहणार असून दाखल झालेल्या अर्जांची छाननी २० फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे . त्यानंतर नामनिर्देशन पत्र माघार घेण्याची मुदत 21 फेब्रुवारी ते आठ मार्च 2023 अखेर राहणार आहे .यापैकी निवडणूक लागल्यास सदर संस्थांसाठी 18 व 19 मार्च रोजी मतदान होणार असून मतदान प्रक्रियेनंतर त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यामध्ये फलटण, वडूज ,सातारा ,दहिवडी, माणव वाई या तालुक्यातील सहकारी संस्थांचा समावेश आहे.
फलटण तालुक्यातील गोखळी विकास सेवा सोसायटी गोखळी ,फरांदवाडी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी फरांदवाडी ,मठाचीवाडी विकास सोसायटी मठाचीवाडी, भैरवनाथ विकास सोसायटी सासवड ,श्रीराम विकास सोसायटी राजुरी ,कुरोली विकास सेवा सोसायटी कुरवली, विडणी विकास सोसायटी विडणी ,समह पवार विकास सेवा सोसायटी मर्यादित पवारवाडी,
त्याचप्रमाणे खटाव तालुक्यातील एनकुळ विकास सोसायटी एनकुळ ,वेटने विकास सोसायटी वेटणे ,सिद्धेश्वर कुरोली विकास सोसायटी सिद्धेश्वर किरोली, हनुमंतराव साळुंखे विकास सोसायटी कलेढोण, खातवळ विकास सोसायटी खातवळ ,जय भवानी विकास सोसायटी कलेढोण, पेडगाव विकास सोसायटी पेडगाव,
सातारा तालुक्यातील व वर्णे विकास सोसायटी वर्णे ,भैरवनाथ विकास सेवा सोसायटी क्षेत्रमाहुली ,वर्णे विकास सोसायटी वर्णे, मर्दे विकास सोसायटी मरडे कुमठे विकास सोसायटी कुमठे ,सोनापूर विकास सोसायटी सोनापूर, धावडशी विकास सोसायटी, धावडशी ,रानंद विकास सोसायटी रानंद, बोथे विकास सोसायटी बोथे
पाटण तालुक्यातील तारळे विकास सोसायटी तारळे ,कोकिसरे विकास सोसायटी कोकीसरे, उरुल विकास सोसायटी उरुल ,ढेबेवाडी विकास सोसायटी ढेबेवाडी, वांजोळे विकास सोसायटी वांजोळी, कराटे विकास सोसायटी कराटे,
खंडाळा तालुक्यातील वडगाव विकास सोसायटी वडगाव ,यानंतर कराड तालुक्यातील अटके विकास सोसायटी अटके, कारवे विकास सोसायटी कारवे ,कोडोली विकास सोसायटी कोडोली , शेनोली विकास सेवा सोसायटी शेनोली, तुळसण विकास सेवा सोसायटी तुळसण ,कोळेवाडी विकास सोसायटी कोळेवाडी, जिंती विकास सोसायटी जिंती, वारुंज विकास व सोसायटी वारुंजी, जखिन वाडी विकास सोसायटी जखिन वाडी, कराड विकास सोसायटी कराड ,प्रियदर्शनी विकास सेवा सोसायटी कराड, यानंतर कोरेगाव तालुक्यातील विखळे विकास सोसायटी विखळे , तडवळे विकास सोसायटी वाघोली तडवळे, तळीये विकास सोसायटी तळीये, कुमठे विकास सोसायटी कुमठे , वाठारस्टेशन विकास सोसायटी वाठार स्टेशन, रेवडी विकास सोसायटी रेवडी, नागझरी विकास सोसायटी नागझरी, वाघोली विकास सोसायटी वाघोली ,वाई तालुक्यामधील धोम विकास सोसायटी मर्यादित धोम या संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.



