गोपाळवस्ती मधील शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जवळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने सहकार्य करणार…
स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
केळघर. दि.०१. जावली तालुक्यातील जवळवाडी येथील गोपाळवस्ती मधिल पारंपारीक बँड व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्या व्यावसायिकांच्या मुलांचे शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती थक्क करणारी आहे. शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी व भौतिक सुविधांसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने सहकार्य केले जाईल,अशी ग्वाही या कार्यक्रमाच्या वेळी जवळवाडीच्या सरपंच सौ. सुरेखा मर्ढेकर यांनी दिली.

आज गोपाळवस्ती येथे शाळा पूर्व विद्यार्थ्यांच्या पहिली मध्ये प्रवेश घेणाऱ्या ८ विद्यार्थाना शाळेची ओढ लागावी म्हणून त्यांना स्टॉल मांडून देण्यात आले . व या विद्यार्थ्यांची बौद्धिक चाचणी ही घेण्यात आली.यावेळी गोपाळवस्ती शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मुख्यध्यापिका सिंधू जाधव व वैशाली जगताप यांचा सरपंच मर्ढेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
या वेळी मुख्याध्यापिका सिंधू जाधव, सतीश मर्ढेकर,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शामराव चव्हाण, वैशाली जगताप, उज्वला जवळ, संतोषी देशमुख, लक्ष्मी ससाणे, पालक ग्रामस्थ उपस्थित होते.



