युवराज धुमाळ
मेढा. दि.१९ जावली तालुक्यातील मेढा येथील रस्ता रुंदीकरण दरम्यान तोडण्यात आलेल्या महाकाय वृक्षास मेढा येथील नागरिकांनी पुढाकार घेत पुन्हा वेण्णा नदीच्या तिरावर नव्याने प्रस्थापित करून त्या महाकाय वडाचा पुनर्जन्मच जणू घडवून आणला आहे.
काही दिवसांपुर्वीच मेढा रस्त्याचे कामकाज सुरु असताना सुमारे शंभर वर्षापुर्वीचा नागरीकांचा सुखदुःखाचा साक्षीदार असणारा वटवृक्ष तोडण्यात आला होता. या गोष्टीचे शल्य येथील नागरीकांना टोचत होते. याच्यावर येथिलनागरिकांमध्ये खुप चर्चा प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. परंतु काय करावे हे सुचत नव्हते. त्यावेळी सिने अभिनेते मा.श्री. सयाजी शिंदे यांनी अशाच रस्ता रुंदीकरणात तोडण्यात आलेल्या एका महाकाय वृक्षाला पुन्हा प्रस्थापित करून जीवनदान देण्याचा संकल्प करून तो तडीस नेला.याचाच दाखला , आदर्श घेत मेढा येथिल प्रशांत करंजेकर आणि मित्र समूहाने लोकसहभागातून अथक प्रयत्नातुन ते झाड मेढा नगरीच्या वेण्णातीरी पुनःरोपन करण्यात आले,आणि त्यावटवृक्षाला पुनर्जन्म मिळवून देण्याचे कौतुकास्पद कार्य पार पाडले. 
मेढा येथील बाजार चौकातील वडाच्या झाडाचे पुन्हा एकदा वेण्णा नदीकाठी नेऊन. पुनःरोपन कामी त्यांना फारुख भाई,संजय सपकाळ, विनोद वेंदे,बाबुशेठ धनावडे आणि राम बच्चन तसेच सहकारी यांचेही विशेष सहकार्य लाभले. या वृक्षाचे पुनः रोपन व्हावेे या ग्रामस्थ धनंजय पवार यांनी व्हॉट्स अपच्या माध्ययमातुन गुपवर केले होते अखेरीस या मागणीची पुर्तता आणि लोकसहभागातून झाडास जीवनदान असा स्तुत्य उपक्रम राबविला गेल्याने मेढयातील नागरीकांचे चेहऱ्यावर आनंद झळकू लागला आहे.
मेढा येथिल यूवावर्ग विविध राजकिय पक्षात काम करताना समाजहिताकरीता आपली जबाबदारी स्विकारून कार्य करतात हे कौतुकास्पद असून त्यांच्या या कार्याचा शासन दरबारी दखल घेवून गौरव होणे महत्वाचे असल्याचे मत जावली तालुका पत्रकार संघटनेचे सदस्य- पत्रकार अभिजीत शिंगटे यांनी व्यक्त केले.



