स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——-
मेढा. दि.१७. जावळी तालुका वारकरी संघाचे संचालक,कोयना विभाग वारकरी संघाचे खजिनदार व जेष्ठ नागरीक संघ कोयना विभाग प्रमुख श्री नामदेव गणपत भोसले (तापोळा-तेटली) यांनी जेष्ठ नागरीकांसाठी केलेल्या कार्याच्या गौरवार्थ इंटरनॅशनल लाॅन्जेव्हिटी सेंटर इंडिया या संस्थेच्या वतीने पद्मविभूषण शास्त्रज्ञ मा.रघुनाथ माशेलकर,माजी पोलिस महासंचालक मा.जयंत उमराणीकर,भारती विद्यापिठाचे कुलगुरू मा.प्रो.शिवाजीराव कदम यांचे शुभहस्ते पुणे येथे कै.बी.जी.देशमुख जीवन गौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
श्री नामदेवराव भोसले यांनी कोयना विभागात जेष्ठ नागरीकांसाठी केलेले कार्य सर्वश्रुत असून वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून अनेक गावात भजन मंडळे स्थापन केली आहेत. जिल्हास्तरीय सामुदायिक विवाह सोहळ्याच्या नियोजनात दिलेल्या योगदानाबद्दल धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या वतीने त्यांना यापूर्वीच गौरविले आहे.सामान्य कुटुंबात जन्मलेल्या भोसले यांनी टेलरींग व्यवसाया बरोबरच पोष्टाची नोकरी करून आपल्या परिवारीक समृध्दी बरोबरच सामाजिक कार्यात अग्रेसर रहावून केलेल्या कार्याचा यापूर्वीही अनेक संस्थांनी पुरस्कार देवून सन्मान केला आहे.
कै.बी.जी.देशमुख जीवन गौरव पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून ३ व्यक्तींची निवड करण्यात आली होती.त्यामधे जिव्हाळा जेष्ठ नागरीक संघाच्या माध्यमातून श्री नामदेव भोसले यांची झालेली निवड ग्रामीण भागातील जेष्ठांची प्रेरणा वाढविणारी आहे.पूणे येथे झालेल्या या पुरस्कार सोहळ्याला कोयना विभाग वारकरी संघाचे अध्यक्ष ह.भ.प.बाळकृष्ण महाराज शिंदे,विलासबाबा जवळ, कोंडीराम महाराज शिंदे, आनंद जाधव,बाळकृष्ण गुरूजी सपकाळ,पांडूरंग साळुंखे गुरूजी,गणेशबुवा सपकाळ,गणेश सपकाळ मा.सरपंच वेळापूर इ.उपस्थित होते.त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.