सातारासामाजिक

भागीदारीत मराठी चित्रपट निर्मितीसाठी राम पब्लिसिटीची अभिनव संकल्पना

स्टार ११ महाराष्ट्र न्युज —— 

मुंबई. दि .१७.‘राम पब्लिसिटी’ ही नाट्य, संगीत, चित्रपट, मालिका, ओटीटी क्षेत्रातील मान्यता प्राप्त जनसंपर्क व्यवस्थापन संस्था आहे. गेली २२ वर्षे ही संस्था मनोरंजन क्षेत्रात धडाडीने कार्यरत असून शेकडो मराठी चित्रपटांच्या प्रसिद्धी जनसंपर्कासोबतच ‘खंडोबाच्या नावानं’, ‘सैल’, ‘दशक्रिया’ आणि बंदिशाळा या चित्रपटांच्या कार्यकारी निर्मितीचे कामही केले आहे.

‘राम पब्लिसिटी’ने एका नव्या मल्टीस्टारर व्यावसायिक चित्रपटाची निर्मिती सुरु केली असून या चित्रपटात आर्थिक आर्थिक गुंतवणूक करून भागीदारी व्यावसायिक होण्याची नामी संधी उपलब्ध करून दिली आहे. अनेक व्यावसायिकांची मराठी चित्रपट निर्मिती करण्याची इच्छा असते, परंतु या व्यवसायाचे ज्ञान नसल्याने ते चित्रपट निर्मितीत उद्योगात येण्याचे टाळतात. अश्या निर्मात्यांना त्यांचे दर्जेदार चित्रपट निर्मितीचे स्वप्न साकार करता येणार आहे. भागीदारीमध्ये अश्या व्यावसायिकांना राम पब्लिसिटीसोबत मराठी चित्रपट सृष्टीतील अनुभवी विश्वसनीय जाणकार दिग्गज कलाकार-तंत्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपट निर्मातीची अभूतपूर्व संधी प्राप्त होणार आहे.

अनेक दर्जेदार विषय असलेले, लोकप्रिय कलाकारांचा, अनुभवी तंत्रज्ञांचा सहभाग असलेल्या मराठी चित्रपटांना जगभरात सर्वत्र उत्तम प्रतिसाद मिळत असून, अनेक चित्रपट कोटींची उड्डाणे पार करण्यात यशस्वी होत असून अश्या कलाकृतींमुळे मराठी चित्रपट व्यवसाय तेजीत असल्याने मराठी चित्रपट निर्मितीतून नफा कमविण्यासाठी राम पब्लिसिटीने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा लाभ घेता येईल. चित्रपट निर्मितीत रस असलेल्या उद्योजकांनी अधिक महितीसाठी rampublicity@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!