
मेढा . दि ०६ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली धार्मिक मातृ संघटना भारतीय बौद्ध महासभा रजि.नं.3227/1955 पब्लिक ट्रस्ट नं. F-982 (मुंबई) या धार्मिक संस्थेची नूतन तालुका कार्यकारणी निवड मेढा येथे भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष प्रा अरुण पोळ सर व भारतीय बौद्ध महासभेचे सातारा जिल्हा अध्यक्ष आयु अरुण भोसले सर यांचे मार्गदर्शनाखाली व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जावली तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे साहेब , डॉ संपत नाना कांबळे , विजय खरात ,वसंत चव्हाण गुरुजी, जिल्हा महासचिव चंद्रकांत कांबळे गुरुजी,कोषाध्यक्ष यशपाल बनसोडे, विकास तात्या जाधव , प्रवीण कांबळे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
जावली तालुक्यातील तमाम धम्म बांधव व आंबेडकरी चळवळील कार्यकर्ते उपस्थित होते .
जावली तालुकाध्यक्षपदी अनिल शिंदे हुमगाव , सचिवपदी दशरथ कांबळे कुडाळ , कोषाध्यक्षपदी रविकांत सपकाळ केडंबे , आनंदा कांबळे वाटंबे ,पोपट सपकाळ, बळवंत बगाडे, विनोद कांबळे,संतोष खरात, नारायण रोकडे , चंद्रकांत जाधव ,शिवाजी साळुंखे,अक्षय जाधव इत्यादी पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली तसेच सातारा जिल्हा उपाध्यक्ष पदी वनअधिकारी दत्तात्रय जाधव यांचीही निवड करण्यात आली
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली अधिकृत धार्मिक मातृ संघटना भारतीय बौद्ध महासभा ही घराघरात पोहचविणार असून जावलीत धम्म चळवळ आजून गतिमान करणार अशी ग्वाही नूतन तालुका अध्यक्ष अनिल शिंदे यांनी दिली .
या प्रसंगी रिपाईचे जावली तालुका अध्यक्ष यांनी आपल्या मनोगतात सांगितले की भारतीय बौद्ध महासभेला जावली तालुक्यात रिपाई सर्वोतोपरी सहकार्य करणार असून धम्माचा प्रचार व प्रसार जोमाने करण्यासाठी लवकरच तालुक्यात बौद्ध धम्म महापरिषदेचे आयोजन राजरत्न आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करणार आहे .
याप्रसंगी बळीराम कांबळे ,डॉ सुहास कांबळे, सुशांत कांबळे, निलेश शिंदे,विशाल सपकाळ, नरेंद्र रोकडे,श्रीरंग कांबळे ,विजय शिंदे,संतोष गायकवाड, संतोष चव्हाण, सुभाष माने, प्रकाश कांबळे इत्यादी जावली तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी उपस्थित होते



