राजकीयसातारा

मेढा नगरपंचायत पंचवार्षिक निवडणूक १५ प्रभागासाठी ३९ उमेदवार निवडणूक लढवणार २ उमेदवार बिनविरोध

स्टार ११ महाराष्ट्र

मेढा.दि.२१. मेढा नगरपंचायत पंचवार्षिक निवडणूक २०२५ अनुषंगाने आज दिनांक २१/११/२०२५ रोजी उमेदवारी अर्ज माघार प्रक्रिया पार पडली सदर प्रक्रियेमध्ये नगरसेवक पदासाठी १७ प्रभागामधून एकूण २ प्रभाग बिनविरोध झाले.

एकूण १५ प्रभागासाठी ३९ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत तर प्रभाग क्रमांक ४ छकुली रावसाहेब देशमुख व प्रभाग क्रमांक ५ आनंदी यशवंत करंजेकर हे बिनविरोध झाले आहेत तसेच नगराध्यक्ष पदासाठी एकूण ३ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत सदरची प्रक्रिया शांततेत पार पडली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!