धार्मिकमहाराष्ट्रसातारा

महाशिवरात्री निमित्त उद्या लघुरुद्र अभिषेकाचे आयोजन

स्टार ११महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संदिप गाडवे

महाबळेश्वर.दि.२८ महाशिवरात्री निमित्त उद्या मंगळवार दि.०१ मार्च रोजी तळदेव (ता:महाबळेश्वर) येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती  अंकुश जंगम यांनी दिली.
पहाटे चार ते सहा या वेळेत लघुरुद्राभिषेक होणार आहे. त्यानंतर नाम जप, महाआरती,भजन, हळदी-कुंकू ,सांज आरतीचा कार्यक्रम होणार आहे.सायंकाळी सात ते नऊ या वेळेत वाई येथील वाईकर मठाचे मठाधिपती महादेव शिवाचार्य वाईकर महाराज यांचे प्रवचन होणार आहे. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहे.तरी वरील कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एकता नेहरू युवा मंडळ, ग्रामस्थ,मंडळ तळदेव यांनी केले आहे.

जावळी तालुक्यातील पांडवकालीन महादेव मंदीर असलेल्या मरडेश्वर येथेही महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. सकाळी सहा वाजता अभिषेक,पूजा व महाआरती होणार आहे. सकाळी दहा वाजता विजय महाराज शेलार यांचे कीर्तन होणार आहे. तर दुपारी बारा वाजता ओव्यांचा व सामूहिक भजनांचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी मान्यवरांचा सत्कार होणार आहे. शेवटी महाआरतीने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!