
स्टार ११महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
केळघर.दि.२२ जावली तालुक्यातील वरोशी येथील काळेश्वरी देवीचं यात्रेच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे आज
विजयराव मोकाशी आणि राजेंद्र मोकाशी यांनी वरोशी येथे स्व.इंदुमती केशव मोकाशी यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त आदर्श माता पुरस्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

आपल्या आईच्या असलेल्या योगदानाची आठवण ठेवून वरोशी सारख्या एका छोट्या गावांमध्ये डोंगरकपारीत या गावामध्ये एकाच घरात दोन मंडळी शासकीय अधिकारी पदावर असणे या गावाचा अभिमान आहे, तसेच या गावातील आदर्श माता लक्ष्मीबाई तुकाराम कासुर्डे व लक्ष्मीबाई विश्वास कासुर्डे यांनी आपल्या मुलांना योग्य संस्कार दिले याची आठवण ठेवून कष्टातून मेहनत करणाऱ्या या दोन्ही मातांनी परिस्थिती नसताना अल्प जमिनीमध्ये कष्ट करून आपल्या संसार उभा केला आदर्श माता म्हणून लक्ष्मीबाई विश्वास कासुर्डे,लक्ष्मीबाई तुकाराम कासुर्डे यांचा आदर्श मातेच सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आ.शशिकांत शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हा राखीव मतदारसंघ बदलला नसता तर बोंडारवाडी धरणासाठीच्या मंजुरी साठी आंदोलन करायचे पण वेळ मी आपणावर कधीच येऊन दिली नसती असे प्रतिपादन यावेळी या कार्यक्रमात शशिकांत शिंदे यांनी केले, बोंडारवाडी धरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी काही लोकांना माझा अडथळा नको म्हणून मी पुढे यायला तयार नव्हतो पण आत्ता माझ्याकडे भरपूर वेळ आहे त्यामुळे बोंडारवाडी धरणाचा प्रश्न हा लवकरात लवकर मार्गी कसा लागेल याकडे लक्ष देऊन लवकरच शिवसेना संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे मा.शिक्षण सभापती अमितजी कदम व धरण कृती समितीला सोबत घेऊन राज्याचे मुख्यमंत्री यांच्या सोबत शेतीसाठी धरणाच्या मंजुरी संदर्भात भेटणार असल्याचे त्यांनी या कार्यक्रमाच्या वेळी आ.शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

या पंचक्रोशीत लोकांनी जो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे तो सामान्य जनतेची सर्व कामे पूर्ण करण्यासाठी शासनाकडून आणि कुठे कमी पडलं आणि हा शशिकांत शिंदे तुमच्या बरोबर आहे मी तुम्हाला एवढा विश्वास देतो कि येणाऱ्या भविष्य काळामध्ये या भागातल्या प्रगती व या भागाच्या आलेल्या अडचणीवर मात करण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करणार असल्याचेही आ. शशिकांत शिंदे यांनी यांनी सांगितले.
आदर्श मातांचा गौरव करून बोंडारवाडी विजयराव मोकाशी व राजेंद्र मोकाशी यांच्या परिवाराने समाजाला नवी दिशा देण्याचे काम केल्याचे आ. शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.यावेळी तहसिलदार पोळ, अमितजी कदम,आतिष कदम, यांनीही आदर्श मातांचा गौरव केला व मोकाशी परिवाराचे या उपक्रमाबद्दल कौतुक केले.
यावेळी आ.शशिकांत शिंदे, शिवसेना संपर्क प्रमुख एकनाथजी ओंबळे मा.शिक्षण सभापती अमितजी कदम, तहसीलदार राजेंद्र पोळ, सरपंच हनुमंतराव शिंगटे,सुनिल नाना देशमुख, साधू चिकणे, बुवासहेब पिसाळ, संजय घोरपडे,सरपंच विलास शिर्के,सुरेश कासुर्डे,पत्रकार मोहन जगताप,बाजीराव धनावडे,आतिष कदम,जितेंद्र कासुर्डे,सचिन बैलकर,अमोल आंग्रे, मा.सरपंच बजरंग चौधरी उपस्थित होते.विजयराव मोकाशी व राजेंद्र मोकाशी यांनी आईच्या स्मृतिनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.आलेल्या उपस्थित विविध पदाधिकारी,मान्यवर कार्यक्रमास आलेले ग्रामस्थांचे आभार मानले.



