सातारासामाजिक

शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाच्या निधीला येत्या अधिवेशनात मिळणार मंजुरी

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज ——-

मेढा.दि .२५. मुंबईवर २६/११/२००८ रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या काळात शहीद तुकाराम ओंबळेंच्या यांच्या पराक्रमाची दखल घेवून राज्य सरकारने त्यांच्या जन्मगावी केंडबे येथे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली होती .पण गेल्या चौदा वर्षापासून स्मारकाच्या रखडलेल्या काम येणाऱ्या अधिवेशनात स्मारकावरती निधी मंजूर करून मी स्वतः स्मारकाच्या भूमिपूजनाला येणार असल्याचे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ओंबळे यांना सांगितले.

शहीद ओंबळे यांचे कुटुंबिय एकनाथ ओंबळे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शहीद ओंबळे यांचे   स्मारक त्यांचे जन्मगावी केडांबे येथे बांधण्यात येणार असून स्मारकासाठी ७१ कोटींचा निधी प्रस्तावित केला आहे, लवकरच स्मारकाच्या कामासाठी निधीची तरतूद करून स्मारकाचे काम पुर्ण केले जाईल.अशी मुख्यमंत्री शिंदे यांनी शहीद ओंबळे यांच्या कुटुंबीयांसोबत चर्चा केली.

स्मारकाच्या निधीची लवकरच  तरतूद करून देणार असल्याने  केडांबे तसेच परिसरातील ग्रामस्थ व नागरिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

येत्या अधिवेशनाच्या काळात शहीद ओंबळे यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देणारअसल्याचे सांगून स्मारक लवकरच बांधणेचा निर्णय घेऊन राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहीद तुकाराम ओंबळे यांना आदरांजली वाहिली.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!