
स्टार ११ महाराष्ट्र न्यूज ——
मेढा.दि.२६ लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ वसंतगड मेढा येथे महायुतीचा महामेळावा होता जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे हे कार्यकर्त्यासहित सदराचा कार्यक्रम उरकून रात्री अकराच्या सुमारास घरी परत जात असताना करंजे गावच्या हद्दीत एक व्यक्ती रस्त्याच्या मधोमध जखमी अवस्थेत पडलेली दिसली जवळच दुचाकीही पडलेली होती रस्त्यावर अंधारात जखमी इसम पडलेला पाहताच रांजणे यांनी आपली गाडी थांबवून खाली उतरले व मोबाईलचा टॉर्च मध्ये बघितले असता सदर व्यक्ती जिल्हा परिषदेतील कर्मचारी व चोरंबे येथील रवींद्र सपकाळ असल्याचे लक्षात येताच रुग्णवाहिकेसाठी फोन लावला मात्र रुग्णवाहिकला वेळ लागेल हे लक्षात येताच रांजणे यांनी सपकाळ यांना आपल्या गाडीत घालून थेट अकरा मिनिटात साताऱ्यातील यशवंत हॉस्पिटल गाठले व या युवकावर तातडीने उपचार सुरू केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे विश्वासू सहकारी आणि जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे हे महायुतीचा मेळावा संपल्यानंतर आपल्या आंबेघर गावी जात असताना करंजे गावच्या हद्दीत जिल्हा परिषदेतील कर्मचारी व माजी आमदार सदाशिव सपकाळ यांच्या नात्यातील रवींद्र सपकाळ हे जखमी अवस्थेत पडलेले दिसले. रांजणे यांनी राजकीय मतभेद न पाहता माणुसकीचे दर्शन घडवत सपकाळ यांच्या डोक्याला मार लागलेला पाहून वेळ न घालवता व रुग्णवाहिकेची वाट न बघताच आपल्या सोबत असलेल्या सागर धनावडे यांच्या गाडीत जखमी सपकाळ यांना टाकून १४० च्या स्पीडने फक्त ११ मिनिटात थेट सातारा येथील यशवंत हॉस्पिटल गाठले.
जखमी रवींद्र सपकाळ यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांच्या नातेवाईकांची वाट न पाहता डॉक्टरांना जे उपचार तातडीने करायचे ते सर्व उपचार सुरू करा पैशाची काळजी करू नका हव तर मी डिपॉझिट भरतो अशी विनंती केली व उपचार सुरू झाल्यानंतर माजी आमदार सदाशिव सपकाळ यांच्याशी संपर्क करून सदर घटनेबाबत माहिती दिली उपचार सुरू झाल्यानंतर सपकाळ यांचे नातेवाईक तातडीने रुग्णालयात दाखल झाले त्यानंतर रांजणे आणि त्यांचे सहकारी सागर धनावडे,बापू शेलार,सुभाष शेलार,समीर शेलार आणि साई रांजणे हे सर्वजण घरी परत आले मात्र घरी आल्यानंतर त्यांना झोप लागत नव्हती जखमीचे तपासणी रिपोर्ट यायची वाट बघत बसले होते रात्री दीड वाजता दीपक सपकाळ यांनी रांजणे यांना फोन करून धोकादायक परिस्थिती नसून काळजी करण्यासाठी काही नाही असे सांगितल्यानंतर मगच रांजणे हे बिनधास्त झोपले.
माजी आमदार सदाशिव सपकाळ आणि ज्ञानदेव रांजणे हे एकमेकांचे राजकीय विरोधक. कार्यक्रमात एकमेकावर टिकली ही नेहमीचीच.मात्र माणुसकीचे दर्शन घडवताना ,रांजणे यांनी राजकारण,विरोध बाजूला ठेवून जखमीला मदत केल्याबद्दल रांजणे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.