
स्टार ११ महाराष्ट्र
जावली तालुक्यातील १२५ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सरपंच पदाचे कालावधी सन २०२५ ते सन २०३० आरक्षण सोडतीचे आयोजन आज २४ एप्रिल २०२५ रोजी मेढा येथील पंचायत समितीच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी जावली विकास व्यवहारे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. यावेळी काही ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांची आरक्षण सोडत चिट्ट्या उडवून शाळेतील विद्यार्थिनीच्या हस्ते काढण्यात आली.
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर गेल्यामुळे अनेक ग्रामपंचायतींमध्ये प्रशासनाच्या माध्यमातून कारभार सुरू ठेवण्यात आला होता. मात्र आता सरपंच आरक्षण सोडत होत असल्याने लवकरच ग्रामपंचायत निवडणुका होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातच नुकत्याच झालेल्या जावली तालुक्यातील १२५ सरपंच पदांच्या आरक्षण सोडतीत केळघर ग्रामपंचायत अनुसूचित जमातीसाठी व सायगाव ग्रामपंचायत अनुसूचित जमाती – महिला यासाठी अनुसूचित जमातीसाठी एकूण दोन ग्रामपंचायत सरपंच पदासाठी आरक्षित करण्यात आली आहे.
अनुसूचित जाती महिला सरपंच पदाकरीता दुंद,दरेबुद्रुक, सावली, पिंपळी,करंजे या आरक्षित केल्या असून, रांजणी, वरोशी, आखाडे भणंग,या अनुसूचित जाती खुल्या प्रवर्गासाठी एकूण नऊ आरक्षित करण्यात आले आहेत.
तसेच नागरिकांचा मागास प्रवर्गामध्ये महिला आरक्षित म्हाते खुर्द, महिगाव,गांजे,आगलावेवाडी,आलेवाडी,महू , सनपाने,आर्डे,केळघर तर्फ सोळशी, निझरे, बिभवी, पवारवाडी,कोळघर,करंदी तर्फ मेढा, वेळे, कावडी आंबेघर तर्फ कुडाळ, या सतरा ग्रामपंचायती मागास प्रवर्गामधील महिलांसाठी राखीव असून, यात नागरिकांचा मागास खुल्या प्रवर्गासाठी कारगाव , काटवली , आसनी, मुकवली, वालुथ, घोटेघर, बामणोली तर्फ कुडाळ,गवडी तळोशी, कुरळोशी, खर्शी तर्फ कुडाळ,बेलावडे,इंदवली तर्फ कुडाळ, बोंडारवाडी, डांगरेघर,वाघदरे,या सोळा ग्रामपंचायती अशा एकूण ३३ ग्रामपंचायती मागास प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.

तर सर्वसाधारण सरपंच पदाकरिता महिला आरक्षित मरडमुरे,काळोशी, बाहुळे, भामघर, शिंदेवाडी, दापवडी, रामवाडी,भालेघर,वाळंजवाडी,वाकी,नरफदेव,केडंबे,गाढवली पुनर्व,कुसुंबी,ओझरे,सोनगाव,करंदोशी,पुनवडी,म्हाते बु.,मोहाट,म्हसवे, भोगावली तर्फ कुडाळ, रायगाव, मोरघर, आपटी,भिवडी,एकीव,कसबे बामणोली, रानगेघर, पानस पुनर्वसन, दिवदेव, उंबरेवाडी, बेलोशी, महामुलकरवाडी, कोलेवाडी,मोरावळे,खर्शी बारामुरे, रुइघर, कुडाळ, तेटली, धोंडेवाडी या एक्केचाळीस जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.

तर सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी मार्ली, गोंदेमाळ, जरेवाडी,दुदुस्करवाडी,दरे खुर्द,सर्जापूर,आनेवाडी,नांदगणे, ओखवडी,गाळदेव,निपाणी,हुमगाव,सरताळे,रेंगडेवाडी,आंबेघर त. मेढा, रिटकवली, हातगेघर, विवर, पिंपरी तर्फे मेढा, अंधारी,मामुर्डी,सांगवी त.मेढा, शेते, जवळवाडी, केसकरवाडी, वहागाव, पानस, सोमर्डी, मुनावळे, केंजळ, मालचौंडी, धनकवडी,कुंभारगणी,शेंबडी,चोरांबे,भोगावली तर्फ मेढा,करंडी तर्फे कुडाळ, करहर या चाळीस जागा ठेवण्यात आले आहेत.

अनुसूचित जाती आरक्षित जागा – महिला ५, खुला 4, एकूण – ०९
अनुसूचित जमाती आरक्षित जागा – महिला १, खुला १, एकूण – ०२
ना. मा. प्र. आरक्षित जागा – महिला १७, खुला १६, एकूण- ३३
सर्वसाधारण आरक्षित जागा – महिला ४१, खुला ४०, एकूण- ८१
जावली मधील एकूण ग्रामपंचायत – १२५
सोडतीवेळी प्रांताधिकारी विकास व्यवहारे, तहसीलदार हनमंत कोळेकर,गटविकास अधिकारी निलेश पाटील,निवासी नायब तहसीलदार सुनील मुनाळे आदींसह महसूल कर्मचारी तसेच तालुक्यातील आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, नागरिक, राजकीय पदाधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

यामध्ये जावली तालुक्यातील काही महत्वाच्या ग्रामपंचायती कुडाळ ग्रामपंचायत सर्वसाधारण महिला तर केळघर ग्रामपंचायत अनुसुचित जमाती तर कुसुंबी सर्वसाधारण महिला यासाठी आरक्षित करण्यात आली असून, एकूण ६४ ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच विराजमान होणार आहेत.