
स्टार ११ महाराष्ट्र
7 मे 2025 रोजी वाई येथे होणार पुरस्कारांचे वितरण
मेढा (अभिजीत शिंगटे) – एक मे कामगार दिनाचे औचित्य साधून गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारा यांचे वतीने आदर्श कामगार पुरस्का2025 जाहीर करण्यात आले आहेत.
गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारा यांचे वतीने दरवर्षी देण्यात येणारा आदर्श कामगार पुरस्कार सोहळा यावेळी महर्षी कर्वे शिक्षण संस्था कन्या शाळा वाई येथे आयोजित करण्यात आला असून या वेळी माननीय श्री विवेक कुलकर्णी साहेब प्रेसिडेंट ऑपरेशन्स गरवारे टेक्निकल फायबर लिमिटेड ( पुणे) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून श्री अरविंद कुलकर्णी साहेब व्हाईस प्रेसिडेंट ऑपरेशन गरवारे टेक्निकल फायबर लिमिटेड बाई आणि श्री युवराज थोरात साहेब एच आर आणि आय आर गरवारे टेक्निकल फायबर्स लि.वाई यांचे प्रमुख उपस्थितीत आणि गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारा अध्यक्ष श्री जयंत देशपांडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे .
यावेळी श्री रोहिदास शिवाजी कुराडे अल्फा लावल प्रा. लि. जुनी एमआयडीसी सातारा , श्री अनिकेत कृष्णात भोसले ,सांगली वैभव को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मुंबई शाखा सातारा श्री दत्तात्रय खंडू जाधव ,गरवारे टेक्निकल फायबर्स लि. वाई,श्री संजय लक्ष्मण खंडागळे, गोदरेज अँड बॉईज मॅन्यु.कं.लि.(गोदरेज मोटार सोल्युशन) शिंदेवाडी ,
श्री दत्तात्रय ज्ञानोबा पवार ,गोदरेज अँड बॉईज मॅन्यू.कं. लि. (गोदरेज मोटार सोल्युशन) शिंदेवाडी, ता.खंडाळा, जि. सातारा , सचिन गुलाबराव पेटकर गरवारे टेक्निकल फायबर्स लि. वाई आदींना आदर्श कामगार पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारा संस्थापक अध्यक्ष श्री.रघुवीर आपटे, श्री.दिलीप चरेगावकर ,श्री. गोपाल खजुरे यांनी सुमारे तीस वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या या रोपाचे रूपांतर सुंदर वटवृक्षात झाले असून त्याची कामगिरी पाहता गुणवंत कामगार प्रतिष्ठान आणि प्रतिष्ठानचे सहकारी यांची प्रगती निश्चितच यशदायक आणि कीर्तीदायक असल्याचे जनमानसात बोलले जात आहे .

सदरचा आदर्श कामगार पुरस्कार 25 वितरण सोहळा बुधवार दिनांक 7 मे 2025 रोजी सायंकाळी पाच तीस वाजता महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था वाई येथे संपन्न होणार असून या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन श्री अमृत साळुंखे उपाध्यक्ष, श्री दादासाहेब काळे सरचिटणीस, श्री संजय गिरी खजिनदार आणि सर्व कार्यकारणी सदस्य गुणवंत कामगार प्रतिष्ठान सातारा यांचे वतीने करण्यात आले आहे.