सातारासामाजिक

बारावीच्या परीक्षेत जावळीतील अंगणवाडी सेविकांचा डंका

स्टार ११ महाराष्ट्र

मुलांना शाळा शिकवत महिलांनी बारावीची परीक्षा केली उत्तीर्ण

कुडाळ प्रतिनिधी.दि.०५.  नुकताच बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये कुडाळमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी बारावी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.


सौ.सुवर्णा विनायक पवार 50.83%,जयश्री प्रकाश कांबळे 42.50%,तर मदतनीस सीमा संतोष कारळे 42.50% मिळून यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्या आहेत.


सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे.परंतु या तिघींनीही सोशल मीडियातील फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, व्हाट्सअप अशा विविध माध्यमांचा वापर न करता,खंडित झालेल्या शिक्षणाची आवड निर्माण करून,शिक्षणाला वयाचे कोणतेही बंधन नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध करत सेवानिवृत्तीच्या वयामध्ये सौ.सुवर्णा विनायक पवार वय ५६ वर्ष यांनी 50.83%,जयश्री प्रकाश कांबळे वय ५६वर्ष यांनी 42.50%,तर मदतनीस सीमा संतोष कारळेवय ३८वर्ष यांनी 42.50% मिळून यशस्वीरित्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत.या तिघींनीही बारावीत घवघवीत यश मिळवले आहे.


आत्ताची तरुणाई हुल्लडबाजी करण्यात व्यस्त असते.तसेच कोणतीही परीक्षा देत असताना मी पास होईन का? मला हे जमेल का अशा विचारातच आपले शैक्षणिक वय वाया घालवत आहेत.या सर्वांसाठी प्रेरणादायी अंगणवाडी सेविका ठरल्या आहेत. तसेच आपले अंगणवाडी सेविकेचे कर्तव्य बजावत,वेळात वेळ काढून घर संसाराचे काम पाहत या तिघींनीही अथक परिश्रम करून हे यश मिळवले आहे.तसेच या तिघींनाही घरातील सर्वांची मोलाची साथ लाभली असून त्यांच्यावर सर्व सामाजिक,राजकीय,शैक्षणिक स्तरावरून कौतुकांचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!