
स्टार ११ महाराष्ट्र न्यूज
मेढा.सुनिल धनावडे. दि.०७ निवडणूक आयोगाने निवडणुकावरील स्थगीती उठवल्यामुळे जावली तालुका सहकारी निवडणूक अधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहिर केलेला आहे त्यातील पहीले टप्यात जावळी तालुक्यातील जनकल्याण ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. केडंबे . कै. दत्तात्रय कळंबे महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या. काटवली . भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. करंदी . श्री काळेश्वरीसाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. भालेघर या संस्थांच्या निवडणूकीचा उर्वरीत कार्यक्रम निवडणूक स्थगिती उठल्यामुळे तालुका सहकारी निवडणूक अधिकारी यांनी जाहिर केलेला आहे सविस्तर निवडणूक कार्यक्रम संस्थेच्या कार्यालयात व निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात मेढा- मोहाट रोड, वेण्णा चौक,मेढा येथे पहावयास मिळेल.
संस्थेचे नामनिर्देशन अर्ज माघार कालावधी १०/१०/२०२२ ते २०/१०/२०२२ निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम – यादी प्रसिद्धी व चिन्ह वाटप- दिनांक २१/१०/२०२२ रोजी होणार आहे
जनकल्याण ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. केडंबे, या संस्थेचे मतदान व मतमोजणी दिनांक २९/१०/२०२२ रोजी होणार आहे . तसेच कै. दत्तात्रय कळंबे महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या. काटवली, या संस्थेचे मतदान व मतमोजणी दिनांक ३०/१०/२०२२ रोजी होणार आहे.
भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. करंदी व श्री काळेश्वरीसाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. भालेघर या संस्थांच्या निवडणूकीचा नामनिर्देशन अर्ज माघार कालावधी – १०/१०/२०२२ ते २१/१०/२०२२ आहे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्धी व चिन्ह वाटप – दिनांक २७/१०/२०२२रोजी होणार आहे.भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. करंदी, चे मतदान, मतमोजणी दिनांक ०३/११/२०२२ रोजी होणार आहे तसेच श्री काळेश्वरीसाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. भालेघर या संस्थेचे मतदान, मतमोजणी दिनांक ०४/११/२०२२ रोजी मेढा या ठिकाणी होणार आहे
अशी माहीती निवडणुक अधिकारी गणेश देशमुख यांनी दिली



