महाराष्ट्रराजकीयसातारा

मेढा ता.जावळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंपर्क अभियान अतंर्गत घेण्यात आला पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज -  युवराज धुमाळ 

मेढा.दि.,०७. १९९९ साली आदरणीय पवार साहेबांनी मला या मतदारसंघातून संधी दिली. जावळीकरांच्या प्रेमाने मी आमदार झालो. इथल्या विकासासाठी मनापासून काम केले. जावळीच्या डोंगरकपारीत राहणाऱ्या तसेच मुंबई व मुंबई उपनगरांमध्ये उपजीविकेसाठी गेलेल्या कष्टकर्यांसाठी काम केले, त्याची पोहोच मला येथील जनतेने परत परत दिली असे प्रतिपादन कार्यक्रमच्या वेळी आ.शशिकांत शिंदे यांनी केले.

मतदारसंघाची पुनर्रचना झाली, पक्ष संघटना टिकली पाहिजे जिथं अडचण असेल तिथे मी काम करतो असे सांगून कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून उभा राहिलो. तिथे ही अपेक्षेपेक्षा खूप प्रेम मिळाल. कोरेगाव मध्ये काम करत आहे व राहीन, मात्र जावळीच्या मातीची नाळ कधी तुटू दिली नाही. इथल्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर असतो. काही लोक माझ्या भूमिकेचा राजकीय विपर्यास करण्याचा प्रयत्न करतात. मात्र आदरणीय पवार साहेबांनी मला प्रेम दिल, पक्षात मानाचं स्थान दिले, मला मंत्री केले त्या साहेबांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी मी झटत असतो. पुढील काळात सर्वाना सोबत घेऊन जावळी मध्ये पक्ष संघटना रुजवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पक्षबांधणीसाठी वेळ देणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना बळ देणार आहे.

या जनसंपर्क अभियानास आदरणीय खा.श्रीनिवास पाटील साहेब, आ.बाळासाहेब पाटील साहेब, श्री.दिपक पवार, श्री. सारंग पाटील, जिल्हाध्यक्ष श्री.सुनील माने, श्री.राजकुमार पाटील, श्री.तेजस शिंदे, श्री.राजेंद्र लवंगरे, श्री.रघुवीर पवार, श्री.शाफिक शेख, श्री. रमेश उबाळे, श्री.समीर डांगे, श्री.शशिकांत वायकर, श्री.भानुदास भोसले, सौ.रुपाली भिसे, श्री.अतिष कदम, सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!