Uncategorized

निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध

स्टार ११ महाराष्ट्र ——
सातारा, दि.१५.   भारत निवडणूक आयोगामार्फत विधानसभा निवडणूक २०२४ साठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणूक कालावधीत निवडणूक अंदाज (ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल) दर्शविण्यावर प्रतिबंध केला आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार सदर अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रकाशित करण्यात आली आहे. या नुसार राज्यात 13 नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजल्यापासून 20 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंतच्या कालावधीत एक्झिट पोल आयोजित करणे, त्यांचे कोणत्याही माध्यमातून प्रसारण करणे, एक्झिट पोलचे निकाल जाहीर करणे यावर प्रतिबंध राहील असे स्पष्ट केले आहे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!