
स्टार ११ महाराष्ट्र
केळघर.सातारा-महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटात चालकाचा ताबा सुटल्याने एक मालवाहू ट्रक संरक्षक कठडा तोडून नाल्यात कोसळला. या भीषण अपघातात ट्रकचा चक्काचूर झाला असून चालक जागीच ठार झाला असल्याचे समजते.

घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार,मालवाहू ट्रक क्रमांक KA 28C5568 हा रोहा या ठिकाणाहून साताऱ्याच्या दिशेने जात होता.केळघर घाटातील मुकवली माची येथील एका धोकादायक वळणावर रात्री ३ वाजता चालकाचा गाडीच्या वेगावर नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट रस्त्याशेजारील नाल्यात कोसळला. ट्रक चालक अजिनाथ नागरगोजे अंदाजे वय 32 वर्षे यवनवाडी जिल्हा बीड याचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताचा झालेला समजताच सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील,स.पो.नि.अश्विनी पाटील यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ आणि सह्याद्री ट्रेकर्सच्या टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने चालकाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केला अडकलेल्या चालकाला मोठ्या कष्टाने बाहेर काढण्यात यश आले पण चालकाचा जागीच मृत्यू झाला होता.




