आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले

जंगल शांत दिसतं म्हणून तिथे वाघ नसतो असा गैरसमज करून घेऊ नका ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे

मेढ्यात शिवेंद्रसिंहराजेंनी फोडली जावळीच्या विकासाची हांडी

स्टार ११ महाराष्ट्र —
मेढा.दि.०९.-   सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत मेढा येथे नामदार छत्रपती बाबाराजे महादहीहंडी हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला. या निमित्ताने श्रीकृष्ण महिला गोविंदा पथकाने महिलांसाठी स्वतंत्र दहीहंडी फोडत उत्सवात रंग भरला.

कार्यक्रमादरम्यान मंत्री शिवेंद्रराजे यांनी राजकीय भूमिका स्पष्ट करणारे वक्तव्य केले.जावळीतील सध्याचे शांत राजकीय वातावरण पाहून कुणी त्याला दुर्बलता समजू नये, अशी तंबी त्यांनी दिली.जंगल शांत दिसतं म्हणून तिथे वाघ नसतो असा गैरसमज करून घेऊ नका, छेडछाड कराल तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना खडसावले. या वक्तव्यानंतर जावळीच्या राजकीय गोटात एकच खळबळ उडाली आहे.

विकासाची हांडी फोडताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे, वसंतराव मानकुमरे,ज्ञानदेव रांजणे साहेब ,सौरभ शिंदे रूपाली वारागडे, विकास देशपांडे आदी

या कार्यक्रमा वेळी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे पंचायत समिती सभापती सौरभ शिंदे,नगराध्यक्ष रूपाली वारागडे उपनगराध्यक्ष विकास देशपांडे  शिवाजी देशमुख,नितीन मगरे,आनंदी करंजेकर,शिवाजी गोरे,रिकी तिवाटणे,सुशांत कांबळे,धनंजय पवार,सुनीता तांबे तेजस्वी इगावे अनघा करंजेकर पुष्पा मुकणे उपस्थित होते.

भाषणानंतर मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रत्यक्ष गोविंदा पथकात सहभागी होत विकासाच्या हंडीला गवसणी घातली आणि उपस्थितांसोबत आनंद साजरा केला. दहीहंडीसाठी विविध ठिकाणातून 12 दहीहंडी गोविंदा पथक सहभागी झाले होते मेढा शहरात प्रथमच इतक्या मोठ्या स्वरूपात आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास नागरिकांनी उदंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

राजकीय निरीक्षकांच्या मते, शिवेंद्रराजेंचे हे विधान म्हणजे केवळ सर्वसाधारण इशारा नसून, विरोधकांना उद्देशून केलेले सूचक भाष्य असल्याची चर्चा सध्या जावलीसह सातारा जिल्ह्यात पसरली आहे. संयमाने सुरू असलेले जावळीचे राजकारण यापुढे अधिक आक्रमक वळण घेणार का, हा प्रश्न या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!