पूनवडी प्रीमिअर लीग मध्ये पाटील वॉरियर्सची बाजी जी. डि. दोस्ती योध्दाज उपविजेता

स्टार ११ महाराष्ट्र – अभिजीत शिंगटे
मेढा.दि.१२. पुनवडी प्रीमिअर लीग मध्ये पाटील वॉरियर्सने बाजी मारीत प्रथम क्रमांक पटकाविला तर जी. डि. दोस्ती योध्दाज उपविजेता ठरला.मौजे पुनवडी येथे पुनवडी प्रिमिअर लिगचे आयोजन भैरवनाथ क्रिकेट क्लब पुनवडी यानी केले होते.
यामध्ये गावातील एकूण आठ संघांनी सहभाग नोंदविला होता. गावातील युवा क्रिकेटपटूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी या स्पर्धामुळे मिळाली होती.खेळातुन गावची एकता व अखंडतेकडे या हेतूने हि स्पर्धा घेतली गेली .गावातील उद्योजक वर्गाने या स्पर्धात आपली प्रत्येकी टिम सादर केली होती.
यामध्ये जी.डी दोस्ती योद्धाज ( श्री. दिपक पार्टे, गणेश पार्टे, ) महाराज इलेव्हन स्टार ( श्री. अशोक पार्टे ) टायगर इलेवन स्टार ( श्री. जयेश पार्टे ) पाटिल वॉरियर्स ( श्री संतोष पां. पार्टे, )धनावडे स्ट्रायकर्स ( श्री संतोष धनावडे, श्री.आनंद पार्टे ) रेंजर इलेव्हन स्टार ( श्री संतोष ल. पार्टे ) आर पी फायटर्स ( श्री. राहूल पार्टे ) स्पार्टन इलेव्हन ( श्री.विनोद पार्टे ) यांनी संघ मालकांची भुमिका बजावली हि स्पर्धा भैरवनाथ स्टेडियम पुनवडी येथे खेळविण्यात आली.
या स्पर्धास ग्रामस्थ मंडळ पुनवडी, ग्रामपंचायत पुनवडी,यांचे मोलाचे सहकार्य लाभल. या स्पर्थात पुनवडी गावातील सुमारे १५० युवकांनी सहभाग घेवून सहभाग या स्पर्धात रंगत आणली.
श्री.गणेश पार्टे (जि.डी.)
गावातील युवकांना पुनवडी प्रिमीअरच्या माध्यमातुन आपले क्रिडा कौशल्य दाखविण्याची संधी प्राप्त झाली असून गावच्या सर्वांगीण विकासासाठी युवावर्गास बरोबर घेवून कार्यरत राहिल्यास पुनवडी गावाचा विकास होईल असा विश्वास जी.डी पार्टे यांनी व्यक्त केला.



