कारवी आळा येथे लागलेल्या वणवा प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना वनविभागाच्या विरोधात आक्रमक

स्टार ११ महाराष्ट्र – न्यूज नेटवर्क
केळघर दि.१२. महाबळेश्वर तालुका हा नैसर्गिक साधन संपत्ती व जैवविविधतेणे अत्यंत संपन्न आहे. महाबळेश्वर तालुक्यातील वन हे अत्यंत घनदाट आहे.या वनामध्ये विविध प्रकारची दुर्मिळ झाडे व वनस्पती आहेत.याशिवाय अनेक प्राणी व पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास देखील हे येथे आहे. पण असे असून देखील सातत्याने होणारी वृक्षतोड व वनव्यांमुळे हे वैभव मोठ्या प्रमाणात धोक्यात आले आहे.तरीही महाबळेश्वर च्या वनविभागाला याबाबत तितकेसे गांभीर्य नाही हे कटाक्षाने महाबळेश्वर मधील जनतेला जाणवत आहे.
दि.०५ मे २०२२ रोजी महाबळेश्वर मधील कारवी आळा या परिसरात जंगलामध्ये सायंकाळी ८ वाजताच्या दरम्यान मोठा वणवा लागलेला होता.या वनव्यामध्ये मोठ मोठे वृक्ष जळत होते तसेच हा वणवा अत्यंत झपाट्याने होता.महाबळेश्वर मधील सह्याद्री प्रोटेकटर्स संघटना व फळणे वस्ती येथील युवकांनी हा वणवा विजवण्याचा प्रयत्न केला .या वनव्याबाबत स्थानिक नागरिकांकडून महाबळेश्वर मधील वनविभागाला ८ वाजताच खबर देण्यात आली होती.पण असे असून देखील वनविभागाचा कोणताही कर्मचारी रात्री उशिरा पर्यंत या ठिकाणी वणवा विजवण्यास आला नाही.
येथील या युवकांनी अत्यंत धाडसाने या वनव्यावर कोणत्याही प्रकारच्या वनविभागाच्या साधनसामग्री शिवाय नियंत्रण मिळवले. जर या युवकांनी वणवा विजवण्याचे धाडस दाखवले नसते तर महाबळेश्वर च्या वनविभागाचे अधिकारी कर्मचारी येईपर्यंत मोठ्या प्रमाणात वनसंपदेचा ह्रास झाला असता. त्यामुळे हा वणवा विजवण्याची सर्वस्वी जबाबदारी वनविभागाची असताना वनविभागाने याकडे जाणीवपूर्वक साफ दुर्लक्ष केले हे सिद्ध होत आहे.
या वनव्यामध्ये मोठ्या प्रमाणात वनसंपदा ही जळून गेलेली आहे अनेक प्राणी पक्षी होरपळून गेल्याची ही शक्यता यात आहे.त्यामुळे या प्रकरणाची सखोल चोकशी व्हावी व या बाबतचा खुलासा येत्या १० दिवसांमध्ये महाबळेश्वर मधील सर्व निसर्गप्रेमींना मिळावा तसेच याबाबत वनविभागाच्या दोषी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष ओंकार पवार यांच्यामार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी मनसे वाहतूक सेनेचे तालुका अध्यक्ष ओंकार नाविलकर , श्रीकांत जाधव , सह्याद्री प्रोटेकटर्स चे संदेश भिसे ,सचिन गुजर,आशिष पवार ई. उपस्थित होते.



