महाराष्ट्रसातारासामाजिक

जावळी तालुक्यातील बामणोली तर्फ कुडाळ येथील वीरजवान प्रथमेश पवार अनंतात विलीन

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –  युवराज धुमाळ

कुडाळ.दि.२४.सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील बामणोली तर्फ कुडाळ येथील वीरजवान प्रथमेश संजय पवार अनंतात विलीन झाले.सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारस बामणोली तर्फ कुडाळ येथील दत्तमंदिरानजीक मोकळ्या पटांगणावर शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लहान भाऊ आदित्य पवार यांनी साश्रूनयनांनी मुखाग्नी दिला.यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कुटुंबीय, मित्रपरिवारासह ,तालुका, जिल्हाभरातून नागरिक बामणोलीत आलेले होते.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
बामणोलीसह आजूबाजूच्या परिसरात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते.पुणे येथून सकाळी त्यांचे पार्थिव सकाळी सात वाजता पाचवड ता.वाई येथे आणण्यात आले.येथून फुलांनी सजवलेल्या ट्रॉलीतून जवान प्रथमेश यांचे पार्थिव घेऊन निघालेली शोभायात्रा सरताळे, कुडाळ, शेते,सोमर्डी मार्गे ,बामणोली तर्फ कुडाळ, डेरेवाडी येथे पोहचली.त्यांच्या घरी पार्थिव पोहचताच जवान प्रथमेश यांच्या आईने केलेला आक्रोश उपस्थितीतांचे मन हेलावून टाकणारा होता.परिसरातील गावचे आबालवृद्ध शहिद जवान यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रस्त्यावर उभे होते. या अंत्ययात्रेत देशभक्तीपर गीतांबरोबरच ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘अमर रहे… अमर रहे… वीर जवान प्रथमेश पवार अमर रहे’, अशा घोषणा देत होते.

वीरजवान प्रथमेश पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हा परिषदेचे सदस्य दीपक पवार,पंचायत समितीच्या सभापती जयश्री गिरी, उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे-खराडे ,तहसीलदार राजेंद्र पोळ ,सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने ,गटविकास अधिकारी रमेश काळे यांच्यासह आदींसह विविध विभागाचे अधिकारी,जिल्हा सैनिक कार्यालयाचे अधिकारी,निवृत्त जवान ,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!