महाराष्ट्रराजकीयसातारा

सातारा जिल्ह्यात शिवसंपर्क अभियानाला पाचगणी,महाबळेश्वर आणि तापोळा येथून मोठ्या उत्साहात सुरुवात

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – युवराज धुमाळ
केळघर.दि.२७.शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री ना.श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सुरु झालेल्या शिवसंपर्क अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला खासदार श्री.श्रीकांत एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सातारा जिल्ह्यातील पाचगणी, महाबळेश्वर आणि तापोळा येथून मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली.
सर्वप्रथम पाचगणी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन करून या अभियानाअंतर्गत पाचगणी, महाबळेश्वर आणि तापोळा विभागात आयोजित पदाधिकारी आणि शिवसैनिक संवाद मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांशी संवाद साधत आवश्यक असणाऱ्या स्थानिक पातळीवरील समस्या आणि प्रश्नांबाबत चर्चा करत त्यांचे निराकरण करण्याची ग्वाही दिली. स्थानिक पातळीवर पक्ष संघटनात्मक बांधणी आणि शिवसेना पक्षाचे बळकटीकरण करण्यासंदर्भात यावेळी मार्गदर्शन करत गेल्या अडीच वर्षामध्ये माननीय शिवसेना पक्षप्रमुख ना.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेत्तृत्वाखाली राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यभर विविध विकास कामांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास घडत असून राज्यात केलेल्या आणि होत असलेल्या विकास कामांची माहिती समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट आपण ठेवायचे आहे, असे यावेळी स्पष्ट केले.
२६ मे पासून ते २९ मे पर्यंत सातारा जिल्ह्यात सुरु झालेल्या शिवसंपर्क अभियानांतर्गत खासदार श्री.श्रीकांत एकनाथजी शिंदे यांनी जिल्ह्यातील विविध तालुके आणि विभागांना भेटी देत तेथील स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक यांच्यासमवेत संवाद साधत त्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले,या दौऱ्यादरम्यान काल तापोळा येथील श्री_पद्मावती_देवी च्या मंदिरात जाऊन देवीचे मनोभावे दर्शनही घेतले.
या प्रसंगी शिवसेना उपनेते व सातारा-सांगली जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.नितिन बानुगडे-पाटील, शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे, कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी, तसेच पाचगणी, महाबळेश्वर,तापोळा,येथिल शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!