महाराष्ट्रसातारासामाजिक

पत्रकारितेतील राष्ट्रीय भास्कर भूषण पुरस्काराने वसीम शेख सन्मानित गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाला सन्मान

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – युवराज धुमाळ

कुडाळ. दि.२९. दैनिक तरुण भारतचे पत्रकार जावली पत्रकार संघाचे अध्यक्ष वसीम शेख यांना द प्राइड ऑफ इंडिया भास्कर भूषण राष्ट्रीय स्तरावरील पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल गोवाचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र जर्नालिझम फाउंडेशन चा दर वर्षी देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील भास्कर भूषण पुरस्कार गोवा साखळी येथे आयोजित करण्यात आला होता शोध पत्रकारिता व पत्रकारितेमधील उल्लेखनीय योगदान या सर्व वृत्तपत्र कार्याची दखल घेऊन दैनिक तरुण भारतचे पत्रकार वसीम शेख यांना या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती.

या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून गोवा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत समारंभाचे अध्यक्ष प्रतापसिंह राणे माजी मुख्यमंत्री गोवा, श्रीपाद नाईक, सदानंद शेटे, दिगंबर कामत, रमाकांत खलप माजी केंद्रीय मंत्री,किशोर नाईक, अजित सिंह राणे, त्याचबरोबर महाराष्ट्र जर्नलिझम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ राजू लोहार ,कार्याध्यक्ष इम्तियाज मुजावर आधी मान्यवर उपस्थित होते.

त्याप्रमाणे गोवा साखळी येथे त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आला ,गेल्या 10 वर्षापासून दैनिक तरुण भारत , एम मिडीया, V M न्यूज मराठी माध्यमांमध्ये शोधपत्रकारिता अवैध दारूधंदे ,मटका ,जुगार, अनधिकृत बांधकाम त्याचबरोबर निर्भीड पत्रकारितेमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली ,या पुरस्कार व गौरवा नंतर जावली तालुक्या सह सातारा जिल्ह्या तुन वसीम शेख यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला, जावळी सातारा चे विद्यमान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले,, आमदार शशिकांत शिंदे, वसंतराव मानकुमरे ,सौरभ शिंदे महाबळेश्वर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सादिक सय्यद व तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी पत्रकार वसीम शेख यांचे अभिनंदन केले.

Team Star11Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!